CCTV Mandatory in medical Dainik Gomantak
गोवा

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

CCTV Mandatory in Medical Shops: औषधांच्या विक्रीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मांडला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: औषधांच्या विक्रीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मांडला आहे. अनुसूची एच, एच-१ आणि एक्समध्ये समाविष्ट असलेल्या औषधांची विक्री करताना नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी ही व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे.

प्रस्तावानुसार, औषध दुकानांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून औषधांची विक्री आणि संबंधित व्यवहारांचे दृश्य नोंदविले जाऊ शकते. या नोंदी ठरावीक कालावधीपर्यंत जतन करणेही आवश्यक करण्याचा विचार आहे. प्राथमिक माहितीनुसार, सीसीटीव्ही चित्रण किमान तीन महिने जतन करण्याची तरतूद प्रस्तावित आहे.

अनुसूची एच, एच-१ आणि एक्समधील औषधांच्या विक्रीवर आधीपासूनच विविध नियम लागू आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशा औषधांची विक्री होऊ नये, तसेच विक्रीची आवश्यक नोंद ठेवली जावी, यासाठी औषध विक्रेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या नियमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचा उद्देश आहे. मात्र, ही व्यवस्था सध्या लागू झालेली नाही.

दरम्यान, अनुसूची एच, एच-१ आणि एक्समधील औषधांच्या विक्रीवर आधीपासूनच कठोर नियम आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधे विकली जाऊ नयेत, विक्रीची नोंद ठेवावी आणि संबंधित व्यवहारांचा मागोवा घेता यावा, यासाठी औषध विक्रेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

अंतिम अधिसूचना येणार

विशेष म्हणजे, प्रस्तावित सीसीटीव्ही व्यवस्था घाऊक औषध विक्रेत्यांना लागू होणार नसून, ती किरकोळ औषध दुकानांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्या औषध दुकानांना, कोणत्या प्रकारचे कॅमेरे आणि किती कालावधीसाठी चित्रण जतन करावे लागेल, याबाबतचे स्पष्ट नियम समोर येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT