goa recruitment.jpg
goa recruitment.jpg 
गोवा

गोव्यात होणार वैद्यकीय भरती; 50 डॉक्टर, 140 परिचारिकांची कंत्राटी पद्धतीने होणार नेमणुक

दैनिक गोमंतक

पणजी: राज्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात नवे कोरोना संसर्गित रुग्ण वाढू लागल्यामुळे आरोग्य खात्याने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मडगाव येथील जिल्हा इस्पितळ कोविड उपचार केंद्र म्हणून जाहीर केले असून बांबोळी येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्येही कोविड उपचार केंद्र सुरु केले आहे. या केंद्रात एका कोरोना रुग्णाला दाखल करण्यात आले. सरकारने कोविड उपचार केंद्रांसाठी 50 डॉक्टर व 140 परिचारिका कंत्राटी पद्धतीने घेण्याचा (Recruitment) निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आरोग्य खात्याने जाहिरात दिली आहे. (Medical recruitment to take place in Goa; 50 doctors, 140 nurses will be appointed on contract basis)
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण वाढल्यानंतर या दोन्ही जागांसह तालुक्यांच्या इतर ठिकाणीही कोरोना उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली होती. कोरोनाची कमी लक्षणे असलेल्या व्यक्तींना येथे ठेऊन उपचार केले जात होते. मात्र कालांतराने आरोग्य खात्याने ज्या कोरोनाबाधित व्यक्ती घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत होत्या, त्यांना खास आरोग्य किट उपलब्ध करणे सुरु केल्यानंतर घरातच  उपचार घेणाऱ्यांची  संख्या वाढली. आजच्या घडीला चार हजाराच्या आसपास सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण राज्यात आहेत. त्यातील बहुतांश घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. जास्त त्रास जाणवला, तरच ते इस्पितळात दाखल होत आहेत. मात्र गेल्या काही दिवसात कोरोनाचा संसर्ग वेगाने होऊ लागल्यामुळे आरोग्य खात्याने राज्यात जादा खाटांची सोय करून ठेवली आहे. त्याचबरोबर गरज पडणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. इतर आवश्‍यक त्या सुविधा व उपकरणे राज्यात उपलब्ध आहेत. 

जुने गोवेत रेल्वेच्या धडकेमुळे नौदल अधिकारी व एका महिलेचा मृत्यू
घरोघरी तपासणी:
राज्यातील नागरिकांची कोरोना तपासणी करण्यासाठी फिरते आरोग्य वाहन तयार करून त्यांद्वारे घरोघरी तपासणी करण्याचा विचार असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.  इस्पितळात यावे लागते, म्हणून काही लोक त्रास जाणवला, तरी घरीच राहतात. त्यानंतर कोरोनाची लक्षणे वाढल्याने त्यांना त्रास होतो. त्यासाठी घरोघरी तपासणी केल्यास लोकांना दिलासा मिळेल. त्यासाठीच फिरत्या वाहनाद्वारे तपासणी करण्याचा विचार असल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

काही स्ट्रेन गोव्यात:
राज्यात डबल मुनंट स्ट्रेनसह, काही स्ट्रेन गोव्यात दाखल झाल्याचा संशय आरोग्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करत आहेत. डॉ. शेखर साळकर यांनी याला दुजोरा दिलेला आहे. डबल मुनंट  स्ट्रेन पहिल्यांदा नागपुरात आला आणि त्यानंतर तो देशभर पसरला. मात्र लोकांनी घाबरण्याचे करण नाही, कारण सर्व स्ट्रेन्सचा अंश समान असल्याने भारतात उत्पादित केलेल्या कोविड प्रतिबंधक लसी या स्ट्रेनवर मात करण्यास समर्थ आहेत, असेही डॉ. साळकर यांनी सांगितले. 
लॉकडाऊन नकोच:
राज्यात यापूर्वी कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) वाढल्यानंतर लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला होता. मात्र त्यामुळे पर्यटन उद्योग संकटात सापडला. आता वर्षभरानंतर तो नुकताच उभारी घेत आहे, अशा वेळी पुन्हा लॉकडाऊन लावल्यास पर्यटन उद्योगाला उतरती कळा लागेल. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी योग्य ते उपाय करतानाच पर्यटन उद्योगासह राज्यातील सर्व व्यवहार सुरुच  राहायला हवेत, अशी मागणी सीआयआयचे  व ट्रॅव्हल व टुरिझम संघटनेचे माजी अध्यक्ष राल्फ डिसोझा यांनी केली आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित हॉटेलातील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास प्राधान्य देण्याची मागणीही डिसोझा यांनी यावेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT