Medical Camp for Goa Police Dainik Gomantak
गोवा

Medical Camp: पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या शिबिरांची शृंखला पणजीतून सुरु

Medical camp at Panjim: गोवा पोलीस वैद्यकीय शिबिरांच्या मालिकेतील पहिले शिबीर

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim,Goa

पणजी: गोवा पोलीस आणि रोटरी क्लब ऑफ पर्वरीने एकत्र येत काल वैद्यकीय शिबिरांच्या मालिकेतील पहिले शिबीर आयोजित केले होते. अल्तिन्हो पणजी इथे आयोजित केलेल्या या शिबिराचा प्रमुख उद्देश पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणे आणि शारीरिक समस्या सोडवणे होता.

सदर आरोग्य शिबिरात महिला कर्मचाऱ्यांसह एकूण 500 कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. मात्र अधिकाधिक पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणीचा फायदा मिळवा म्हणून येणाऱ्या 20 महिन्यांसाठी हा उपक्रम सुरु राहील.

कालच्या वैद्यकीय तपासणीमध्ये लिव्हरची तपासणी करण्यासाठी फायब्रोस्कॅन चाचण्यांचा समावेश करण्यात आला होता. शिवाय हिपॅटायटीस बी आणि सी साठी आवश्यक तपासणी करण्यात आली. महिला पोलिसांची कॅन्सर तपासणी हा देखील शिबिराचा महत्त्वाचा भाग होता.

आलोक कुमार (DGP गोवा पोलीस) यांनी शिबिराचे उद्घाटन करताना तंदुरुस्त आणि कार्यक्षम पोलिस दल उभारण्यासाठी आरोग्य हा महत्वाचा मुद्दा असण्यावर भर दिला. निरोगी आरोग्य ही सार्वजनिक सुरक्षिततेची गुरुकिल्ली असल्याचंही ते म्हणाले होते.

गोव्यातील सर्व पोलिसांच्या आरोग्याची सुव्यवस्थात निश्चित करण्यासाठी महिन्यातून दोनवेळा या शिबिरांचे आयोजन केले जाईल. येणाऱ्या शिबिरांमधून निरोगी आयुष्य, पोषण आणि व्यायाम या घटकांवर तज्ज्ञांकडून भर दिला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा पोलिसांनी मिळवून दिला रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT