Bandodkar T-20 League Dainik Gomantak
गोवा

Bandodkar T-20 League: बांदोडकर करंडक! जीनो क्लबचा विजय, एमसीसी संघाचे आव्हान संपुष्टात

साळगावकर क्रिकेट क्लबने धेंपो क्रिकेट क्लबला 45 धावांनी हरवून आव्हान कायम राखले.

किशोर पेटकर

Bandodkar T-20 League: पणजी जिमखान्याच्या बांदोडकर करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी सलग दुसरा पराभव स्वीकारल्यामुळे एमसीसी संघाने आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. जीनो स्पोर्टस क्लबने त्यांना 24 धावांनी हरविले. आणखी एका सामन्यात साळगावकर क्रिकेट क्लबने धेंपो क्रिकेट क्लबला 45 धावांनी हरवून आव्हान कायम राखले.

स्पर्धा कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू आहे.

एमसीसी संघाला मंगळवारी चौगुले स्पोर्टस क्लबने आठ विकेट राखून नमविले होते. त्यामुळे सलग दुसऱ्या पराभवामुळे त्यांना पुढील फेरी गाठणे अशक्य ठरले. ब गटातून आता पणजी जिमखाना व जीनो क्लबने उपांत्य फेरी निश्चित केली असून त्यांच्यात गटसाखळीत अव्वल स्थानासाठी चुरस असेल.

साळगावकर क्लबला मंगळवारी चौगुले क्लबने नमविले होते. बुधवारी त्यांनी धेंपो क्लबला हरवून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या. गुरुवारी धेंपो क्लबने चौगुलेला नमविल्यास उपांत्य फेरीतील संघ निश्चितीसाठी धावसरासरीस महत्त्व प्राप्त होईल.

संक्षिप्त धावफलक

जीनो स्पोर्टस क्लब: २० षटकांत ५ बाद १८८ (आनंद तेंडुलकर ७२- ५१ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार, ईशान गडेकर ३३, एकनाथ केरकर २१, गुरिंदर सिंग २१, सनथ नेवगी नाबाद ३२, सुमीत कुमार २-३३, दीपक पुनिया १-२८, दर्शन मिसाळ १-३७, वेदांत नाईक १-३२) वि. वि. एमसीसी: १९.५ षटकांत सर्वबाद १६४ (दीपक पुनिया २६, दर्शन मिसाळ २३, सुमीत कुमार २२, शौर्य जगलन २६, समीत आर्यन मिश्रा २-३८, मानस २-२५, अमित यादव १-२९, हर्षद गडेकर २-२१, गुरिंदर सिंग ३-५१), सामनावीर: आनंद तेंडुलकर (जीनो).

साळगावकर क्रिकेट क्लब: २० षटकांत ५ बाद १८९ (अमोघ देसाई ३०, साहिल माकवाना २४, सुजित नायक ४३, दीपराज गावकर नाबाद ६०- २३ चेंडू, २ चौकार, ७ षटकार, फरदीन खान २-२९, साईश कामत १-१२, रोहन बोगाटी १-१५) वि. वि. धेंपो क्रिकेट क्लब: २० षटकांत ८ बाद १४४ (करण वस्सोदिया २२, अभिनव तेज राणा २४, सागर मिश्रा नाबाद ३४, लकमेश पावणे १-३७, श्रीनिवास फडते २-३०, दीपराज गावकर १-५, सुजित नायक २-९, अमोघ देसाई २-१७), सामनावीर: दीपराज गावकर (साळगावकर).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT