Mazi Bus Scheme Inauguration Dainik Gomantak
गोवा

Mazi Bus Scheme: दक्षिण गोव्यात 'माझी बस' योजनेला सुरुवात; कदंब महामंडळाचा आर्थिक बोजा होणार कमी

Kavya Powar

Mazi Bus Scheme Inauguration: आज परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते दक्षिण गोव्यात 'माझी बस' योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल KTC चेअरमन उल्हास तुयेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या योजनेत एकूण 66 बसेसची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी 25 बस दक्षिण गोव्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत.

परिवहन मंत्र्यांनी आखलेली ही योजना अतिशय प्रभावशाली असून यामुळे कदंब परिवहन महामंडळाचा आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमावेळी नीलेश काब्राल म्हणाले की, 'माझी बस' योजना यशस्वी होईल; कारण ती बसमालक आणि केटीसी या दोघांच्या मदतीने चालवली जाईल. मी परिवहन मंत्र्यांना गोव्याच्या सर्व बससाठी अॅप सुरू करण्याची सूचना केली आहे, ज्यामुळे बस मालक आणि प्रवाशांनाही मदत होईल.

याबाबत माविन गुदिन्हो म्हणाले की, आज माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे; कारण प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर 'माझी बस' योजनेतून 25 बसेस सुरू होत आहेत. पुढील 6 महिन्यात आम्ही KTC साठी अॅप विकसित करू. यामुळे प्रवासी त्यांची बस कुठे पोहोचली आहे ते पाहू शकतील.

मडगाव बसस्थानकाची स्थिती अत्यंत खराब असून त्याची दुरुस्ती करण्यासाठी मी केटीसी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. तसेच या दुरुस्ती कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातून 3 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

इथे पहा व्हिडिओ:

ते पुढे म्हणाले की, सरकार पणजीतील जुन्या बसेस लवकरात लवकर बदलण्याच्या प्रयत्नात असून शहरातील वाहतूक स्मार्ट बनवण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत 48 बसेस मिळाल्या असून येत्या दोन आठवड्यात आम्ही त्या सुरू करू. त्यामुळे गोव्यातील इतर बस मालकांनी या योजनेत सामील व्हावे, अशी मी त्यांना विनंती करतो.

गोव्यातील प्रमुख बसस्थानकांच्या विकासाबाबत मी नितीन गडकरी यांची भेट घेतली असून पहिल्या टप्प्यात आम्ही येत्या काही दिवसांत पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसातील बसस्थानके विकसित करणार आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT