Mazi Bus Scheme Dainik Gomantak
गोवा

'Mazi Bus' Scheme: रात्री उशिरापर्यंत बससेवेचं स्वप्न प्रत्यक्षात येईना, 'माझी बस' उपक्रमाचा या कारणामुळे 'टायर पंक्चर'

दैनिक गोमंतक

Margao : खेडेगावात रात्री उशिरापर्यंत प्रवाशांसाठी बससेवा उपलब्‍ध असावी, यासाठी कदंब वाहतूक महामंडळाने खासगी बसेस ‘माझी बस’ योजनेखाली आपल्‍या ताब्‍यात घेऊन या बसेस रस्‍त्‍यावर आणण्‍याची योजना जाहीर करून कित्‍येक दिवस झाले तरीही ही याेजना अजून मार्गी लागलेली नाही. हा उशीर होण्‍याचे कारण म्‍हणजे खासगी बसवाल्‍यांना भाड्यापोटी किती रक्‍कम द्यावी यावर महामंडळाची गाडी अडली होती. या आर्थिक वाटाघाटीत वेळ गेल्‍यामुळेच या योजनेचा ‘टायर पंक्‍चर’ झाल्‍याचे समजते.

ही योजना 30 जूननंतर टप्‍याटप्‍प्‍याने सुरू केली जाईल, अशी माहिती कदंब वाहतूक महामंडळाचे अध्‍यक्ष उल्‍हास तुयेकर यांनी दिली. काही बसमालकांनी त्‍यांना मिळणाऱ्या रोजंदारीवर चर्चा करण्‍यासाठी अधिक वेळ मागून घेतली. त्‍यामुळेच ही योजना काही काळासाठी रेंगाळली, असे त्‍यांनी सांगितले. या योजनेत सामील होण्‍यासाठी सध्‍या 75 बसमालकांनी स्‍वत:ची नाेंदणी करून घेतली आहे. त्‍यात आणखीही भर पडेल, असे तुयेकर यांनी सांगितले.

काही बसमालकांना आपल्‍या जुन्‍या बसेसची दुरुस्‍ती करण्‍यासाठी आर्थिक मदत हवी. हाही प्रस्‍ताव आम्‍ही सरकारसमोर मांडला आहे. या प्रस्‍तावाला मंजुरी मिळाल्‍यानंतर आमच्‍याकडे आणखी बसेस येण्‍याची शक्‍यता आहे, असे तुयेकर यांनी सांगितले. नव्‍या वाहतूक धोरणाप्रमाणे 15 वर्षांवरील गाड्या आता भंगारात विकणार आहेत, त्‍यामुळे कदंब महामंडळाला रस्‍त्‍यावर चालणाऱ्या किमान 20 बसेस भंगारात काढाव्‍या लागणार आहेत.

फोंडा, सासष्‍टीतून अल्प प्रतिसाद

कुडचडे व काणकोण या भागातून आमच्‍याकडे बऱ्यापैकी नोंदणी झाली आहे. त्‍यामुळे 30 जूननंतर या दोन्‍ही मार्गावर ही योजना सुरू होईल. आतापर्यंत काणकोणच्‍या 38 तर कुडचडे, केपे परिसरातील 35 बसमालकांनी आपली नोंदणी कदंब महामंडळाकडे केली आहे. मात्र, फोंडा आणि सासष्‍टी या दोन तालुक्‍यातून अजून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

या योजनेत कदंब महामंडळ बसचालकांना भाडे देणार आहे. मात्र, डिझेलचा आणि ड्रायव्‍हरचा खर्च मूळ बसमालकाला करावा लागेल. या बसेसवर कंडक्‍टर कदंबचे असतील. काही बसमालकांनी गाडीत डिझेल घालण्‍यासाठी आम्‍हाला दररोज रक्‍कम द्यावी, अशी मागणी केली होती. त्‍यानुसार आता बसमालकांना 50 टक्‍के रक्‍कम दर दिवशी दिली जाणार असून राहिलेली निम्‍मी रक्कम आठवड्याच्‍या शेवटी दिली जाईल. ही रक्‍कम देण्‍यासाठी सरकारने महामंडळासाठी चार कोटींची तजवीज केली आहे.

उल्हास तुयेकर, अध्‍यक्ष, कदंब वाहतूक महामंडळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

SCROLL FOR NEXT