Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: मायरॉनच्या मालमत्ताप्रकरणी जप्तीचा आदेश मंजूर, रेड नोटिशीसाठी गोवा पोलिसांनी पाठविला CBIकडे प्रस्ताव

Mayron fraud Case Goa: गोवा पोलिसांकडूनही त्याच्याविरोधात रेड नोटिशीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सीबीआयकडे प्रस्ताव पाठविला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सुमारे १३० कोटींच्‍या घोटाळा प्रकरणातील फरारी मायरॉन रॉड्रिग्स, त्याची माजी पत्नी सुनीता रॉड्रिग्स व विद्यमान पत्नी दीपाली परब यांच्या मालकीच्या सात मालमत्ता जप्‍त करण्‍याबरोबरच अनेक बँक खाती गोठवण्‍यात आली आहेत.

गोवा गुंतवणूकदार आणि ठेवीदार संरक्षण कायदा, २०१८ अंतर्गत अंतरिम जप्तीचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. गोवा पोलिसांकडूनही त्याच्याविरोधात रेड नोटिशीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सीबीआयकडे प्रस्ताव पाठविला आहे.

संशयितांनी गोव्यातील अनेक गुंतवणूकदारांना भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवून लाखोंच्या रक्कमा गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी क्राईम ब्रँचकडे गुन्हा दाखल झाला असून त्याची चौकशी सुरू आहे.

गुन्हे शाखेने यापूर्वी कल्याण, मुंबई येथील मायरॉन रॉड्रिग्स याची पत्नी दीपाली परब हिला अटक केली होती आणि तिचा जामीनअर्ज सत्र न्यायालयाने, मडगाव येथील सत्र न्यायालयाने फेटाळला होता. गुन्हे शाखेने सुनीता रॉड्रिग्स हिलाही अटक केली होती, जिला मुंबई पोलिसांच्या एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्याने ताब्यात घेतले होते.

इंटरपोलने जारी केली होती नोटीस

दीपाली परब हिला भारतीय दंड संहितेच्‍या कलम ४०६, ४२० आणि गोवा गुंतवणूकदार आणि ठेवीदार संरक्षण कायदाच्या कलम ३ आणि ५ अंतर्गत अटक करण्यात आली होती. मुख्य संशयित मायरॉन रॉड्रिग्स सध्या फरारी आहे.

इंटरपोलने यापूर्वी त्याच्याविरुद्ध ब्लू नोटीस जारी केली होती आणि आता गोवा पोलिसांनी संशयित मायरॉन रॉड्रिग्ज जो परदेशात असल्याचा संशय आहे त्याच्याविरुद्ध रेड नोटीस काढण्यासाठी सीबीआयकडे प्रस्ताव सादर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT