Mayem Villagers oppose mining transport Dainik Gomantak
गोवा

खनिज वाहतुकीच्या प्रश्नावरून मयेवासीय आक्रमक

मयेतील सभेत अटक प्रकरणाचे पडसाद, आमदारही लोकांच्या बाजूने

दैनिक गोमन्तक

डिचोली : अनिर्बंध खनिज वाहतुकीविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांना अटक करण्यावरून मये गावात संतापजनक वातावरण पसरले आहे. या प्रश्नावरून मयेवासीय आता एकवटले आहेत. शुक्रवारी सायंकाळी मये येथे दोनशेहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत अटक प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. सरपंच सीमा आरोंदेकर आणि छायापत्रकार संदीप देसाई यांच्यासह नागरिकांना अटक केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी जोरदार मागणी करीत तसा ठरावही या सभेत संमत करण्यात आला.

याप्रकरणी तोडगा निघेपर्यंत खनिज (Mining) वाहतूक करू देणार नाही, असा निर्धारही नागरिकांनी केला आहे. दुसऱ्याबाजूने या सभेस उपस्थित असलेले स्थानिक नागरिक तथा नवनिर्वाचित आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही नागरिकांना पाठिंबा दिला असून, मये गावातून खनिज वाहतूक बंद करण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे खनिज वाहतुकीविरोधात आता आंदोलन चांगलंच पेटण्याची शक्यता आहे.

नियमबाह्य आणि अनियंत्रित खनिज वाहतुकीमुळे धूळ प्रदूषणासह (Pollution) पाणी आदी समस्यांनी मयेवासीय त्रस्त आहेत. याच मुद्यावरून गेल्या बुधवारी 16 मार्चला रस्त्यावर उतरून मयेवासियांनी खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवले होते. त्यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मयेची सरपंच आरोंदेकर, छायापत्रकार संदीप देसाई, माजी सरपंच सखाराम पेडणेकर यांच्यासह आठजणांना पोलिसांनी (Police) अटक केली होती. यामुळे गावात संतापजनक वातावरण पसरले आहे. सरपंच सीमा आरोंदेकर आणि छायापत्रकार संदीप देसाई यांच्यासह नागरिकांना अटक केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. जनतेला नुकसान भरपाई मिळेपर्यंत खनिज उचलण्यास मज्जाव करावा. आदी काही ठराव सभेत मांडण्यात आले. उपस्थित नागरिकांनी हात उंचावून ते संमत केले.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 18 मार्च रोजी संध्याकाळी गावकरवाडा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नवनिर्वाचित आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह सरपंच सीमा आरोंदेकर, पंच, मये भू-विमोचन समितीचे सखाराम पेडणेकर, गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत तसेच कायदा सल्लागार अॅड. अजय प्रभूगावकर उपस्थित होते. या सभेत आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मयेवासियांबरोबर आपण असल्याचे जाहीर केले.

मये गावातून होणाऱ्या खनिज (Mining) वाहतुकीमुळे गावातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मयेतून गावातून होणारी खनिज वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने करणे आवश्यक आहे. असे मत शेट यांनी व्यक्त केले. या विषयावरून येत्या सोमवारी उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेणार. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Zoho Mail: Gmail, Yahoo विसरा आता देशी ई-मेल वापरा; झोहोवर वैयक्तिक आणि बिझनेस मेल कसा तयार कराल? Step By Step प्रोसेस

SCROLL FOR NEXT