Shiv Jayanti Dainik Gomantak
गोवा

Shiv Jayanti : मये महामाया हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात

Shiv jayanti : इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांवर नृत्य सादर केले व सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. यावेळी वेशभूषा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiv Jayanti :

मये, श्री महामाया हायस्कूल मये येथे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. ३५०व्या शिवजयंतीप्रीत्यर्थ श्री. महामाया हायस्कूलच्या सभागृहात मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा गोवेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समवेत शिवजयंती साजरी करण्यात आली.

प्रार्थनासभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका गोवेकर यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंतीची महती सांगितली.

तसेच प्रार्थनासभेत इयत्ता दहावीची कुमारी समृद्धी पत्रे हिने कविता सादर केली तर कुमारी साची मयेकर हिने शिवरायांच्या जीवनावर लेखाचे वाचन केले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांवर नृत्य सादर केले व सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. यावेळी वेशभूषा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

वेषभूषेत रजत कारभाटकर, आर्वि गोसावी, अन्नपूर्णा गोडयाळकर, साईच्छा गोसावी, मेघना कुबल ह्यांना पारितोषिके प्राप्त झाली. इयत्ता सातवीच्या विद्यार्थी कु. सोहम चोडणकर याने मावळ्यांचे भाषण सादर केले.

तसेच आर्वि गोसावी, कविता कुबल, साईशा नाईक, साई शिरोडकर, राजवी किनळकर, ओम मयेकर यांना चित्रकला स्पर्धेत पारितोषिके प्राप्त झाली. बक्षिसे माजी विद्यार्थी संघटनेने प्रायोजित केली होती. सूत्रसंचालन शिक्षिका शिल्पा पेडणेकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT