डिचोली, गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील दोडामार्ग येथील अबकारी खात्याच्या चेकनाका इमारतीची दुरवस्था झाली असून ती मोडकळीस आली आहे. पोर्तुगीजकालीन या इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष गेले नसल्याने ती अत्यंत कमकुवत होत चालली आहे. या इमारतीची वेळीच दुरुस्ती झाली नाही, तर ती कोसळण्याचा धोका आहे.
सदर इमारतीचे नूतनीकरण करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. प्रत्यक्ष कामाला कधी सुरूवात होते, त्याची प्रतीक्षा आहे. दोडामार्ग येथे अबकारी खात्याचा चेकनाका आहे. नाक्याचा कारभार चालणाऱ्या इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दिवसरात्र वास्तव्य असते. परंतु ही इमारत मोडकळीस आल्याने अधिकारी आणि अबकारी रक्षक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
माकडांचा उपद्रव वाढलाय
इमारतीच्या छपराची मोडतोड झाली असून, ठिकठिकाणी कौलेही फुटली आहेत. इमारतीच्या मागच्या बाजूने तर स्थिती भयानक आहे. काही लाकडी वासेही मोडलेले आहेत. पावसाळ्यात या इमारतीत पावसाच्या धारांची गळती लागत असते.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना मनमोकळेपणाने ड्युटी करता येत नाही. सध्या प्लास्टिकचे आच्छादन घालून या इमारतीचे छप्पर झाकण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार दोडामार्ग परिसरात माकडांचा उपद्रव वाढला असून, ही माकडे इमारतीच्या छपरावर उड्या मारत असतात. त्यामुळे कौले फुटत असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.