Arvind Kejriwal Goa Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal Mayem: '..तर मयेवासीयांची पारतंत्र्यातून मुक्तता'! जमीन मालकी हक्कावरुन काय म्हणाले केजरीवाल? Video

Arvind Kejriwal Mayem: शनिवारी मये येथे आयोजित आम आदमी पक्षाच्या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. केजरीवाल बोलत होते.

Sameer Panditrao

डिचोली: राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास मयेवासियांची पारतंत्र्यातून मुक्तता करून त्यांना त्यांचा मूलभूत जमिनींचा मालकी हक्क मिळवून देणार, अशी ग्वाही पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली असून, भाजप आणि काँग्रेस मिलीभगत असल्याचा आरोप केला आहे. शनिवारी मये येथे आयोजित आम आदमी पक्षाच्या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. केजरीवाल बोलत होते.

मये पंचायत सभागृहात (शनिवारी) आयोजित केलेल्या सभेवेळी ‘आप’च्या गोवा प्रभारी आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी मार्लेना, गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर, आमदार व्हेंझी व्हिएगस, प्रवक्ते वाल्मिकी नाईक आणि अन्य उपस्थित होते.

केजरीवाल म्हणाले, मयेतील स्थलांतरित मालमत्तेसंदर्भात २०१४ साली भाजप सरकारने नवीन कायदा केला. मात्र मयेवासीयांना अजूनही मालकीहक्क मिळाला नाही. भाजप आणि काँग्रेस यांची युती असून दोन्ही पक्षांकडून जनतेची लूट सुरू आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना सत्ताभ्रष्ट करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यालया पाठोपाठ जनतेच्या सेवेसाठी मये येथे लवकरच दवाखाना उघडण्यात येईल, असेही अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले. सभेनंतर ''आप''च्या मये कार्यालयाचे उद््घाटन करण्यात आले.

सुशासनासाठी संधी द्या!

आतिषी मार्लेना म्हणाल्या, गोव्यात अराजक माजले असून सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. तसेच नागरिकांना धमकावण्यात येत आहे. राज्यात सुशासनासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला सत्तेवर आणा. व्हिएगश म्हणाले, ॲड. पालेकर म्हणाले, सरकारकडून जनतेची फसवणूक होत आहे असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RCBच्या स्टार खेळाडूचा मोठा निर्णय! संघाला ठोकला रामराम; आता 'या' संघाकडून खेळताना दिसणार

Mormugao Municipality Waste Segregation Training: मुरगाव पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कचरा वर्गीकरणाचे चार टप्पे; प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

Bicholim Food Court: डिचोलीतील 'फूड कोर्ट' अंधारात; दीड महिन्यापासून वीज दिवे बंद; व्यावसायिकांचा उदरनिर्वाह धोक्यात

Seattle Center Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये फूड फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; दोन ठार, पाच जण जखमी Watch Video

Salcete No Development Zone: सासष्टीतील 1.02 कोटी चौमी जमीन 'ना विकास क्षेत्र' करण्याचा प्रस्ताव! 5 गावांचा समावेश, ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

SCROLL FOR NEXT