Ashwini Vaishnav, CM Pramod sawant  Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: गोव्यातील मये रेल्वे स्थानकाबाबत दिल्लीत महत्वाची बैठक! CM सावंत, रेल्वेमंत्री वैष्णव यांच्यात चर्चा

CM Pramod Sawant Meets Ashvini Vaishnav: मुख्यमंत्री सावंत व रेल्वेमंत्री वैष्णव यांच्यात झालेल्या बैठकीत मये रेल्वे स्थानकाच्या विकासावर झालेली चर्चा मयेवासीयांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.

Sameer Panditrao

पणजी: दिल्लीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्यात झालेल्या बैठकीत मये रेल्वे स्थानकाच्या विकासावर झालेली चर्चा मयेवासीयांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. हे रेल्वे स्थानक कोळसा हाताळणीसाठीच आहे असा समज झाला असून येत्या ग्रामसभेत तो विषय गाजण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहेत.

नेवरा, मये आणि सारझोरा येथे नवीन रेल्वे स्थानके बांधण्यात येणार आहेत. तिन्ही ठिकाणी त्यांना विरोध होत आहे. त्यातही मये येथील रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासंदर्भात थेट रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात आल्याने सरकारला त्यात एवढा रस का असा विषय चर्चेत आला आहे. सरकार पेडणे ते काणकोण अशी रेल्वेसेवा रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी सुरू करण्याचा विचार करत आहे.

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान गोव्यातील रेल्वे सेवा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांवर चर्चा झाली. पेडणे - काणकोण मार्गावर वेगवान गाड्या सुरू करणे, सेवा विस्तार करणे आणि मये रेल्वे स्थानकाचा विकास यासंदर्भात चर्चा झाली.

मडगाव स्थानकाच्या दर्जावरही चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी सार्वजनिक-खासगी भागीदारीतून मडगाव रेल्वे स्थानकाचा दर्जा उंचावण्याबाबतही चर्चा केली. यासोबतच अन्य महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकासाच्या विषयांवरही विचारविनिमय झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT