Mayem panchayat Dainik Gomantak
गोवा

Mayem panchayat : मये पंचायत प्रकल्प पूर्णत्वाकडे; दोन वेळा पायाभरणी

कोविडमुळे अडथळा, फेरनिविदेमुळे खर्च वाढला

दैनिक गोमन्तक डिजिटल

गेली बरीच वर्षे प्रतीक्षेत असलेल्या मये पंचायतीच्या प्रलंबित असलेला मये पंचायत इमारत प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण होण्याचे संकेत मिळाले आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचे ७० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

आतापर्यंत या प्रकल्पासाठी तीनवेळा पायाभरणी करण्यात आली होती. २७ डिसेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. ही दुसऱ्यांदा केलेली पायाभरणी होती.

तत्पूर्वी सध्याची इमारत मोडून त्याठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या पंचायत मंडळाच्या कार्यकाळात चार वर्षांपूर्वी या इमारत प्रकल्पाची पुन्हा पायाभरणी करुन इमारत प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. मात्र तांत्रिक आणि ''कोविड'' महामारीमुळे या प्रकल्पाच्या बांधकामात आडकाठी आली आणि बांधकाम रखडले.

नव्याने निविदा

मध्यंतरी कामात निष्काळजीपणा केल्याच्या कारणावरून साधनसुविधा विकास महामंडळाकडून त्यावेळच्या संबंधीत कंत्राटदाराला बाजूला करुन नवीन निविदा काढून दुसऱ्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले. या प्रकल्पाचा सुरवातीचा अंदाजित खर्च 2 कोटी एवढा होता. मात्र फेरनिविदेमुळे आता त्यात 1.6 कोटी रुपये वाढ झाली आहे.

युद्धपातळीवर चालना

गेल्या विधानसभा निवडून येताच आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. त्यांच्याच प्रयत्नामुळे बांधकामाला नव्याने आणि युद्धपातळीवर चालना मिळाली. दरम्यान, गेल्या फेब्रुवारी महिन्यात मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तत्कालीन सरपंच दिलीप शेट आदी पंच उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

SCROLL FOR NEXT