भाजपला आणखी एक झटका बसणार आहे कारण 2022 च्या गोवा निवडणुकीपूर्वी त्यांचे मयेम आमदार प्रवीण झांट्ये (Praveen Zantye) यांनी विधानसभेचा राजीनामा दिला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) मयेम मतदारसंघातून 12,430 मतांनी विजयी झालेले, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात (MGP) प्रवेश करणार आहेत.
डिसेंबरमध्ये भाजपने मयेमसाठी (Mayem) एमजीपीचे संभाव्य उमेदवार प्रेमेंद्र शेट यांचा समावेश केल्यानंतर झांट्ये यांना मयेममधून भाजपचे (BJP) तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाली होती. झांट्ये हे पक्ष सोडणारे भाजपचे चौथे आमदार (MLA) ठरणार आहेत. गोव्यात 14 फेब्रुवारीला विधानसभेची निवडणूक होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.