Mayem Lake Dainik Gomantak
गोवा

Mayem Lake: ‘या...या, मया या’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या तलावाकडे पर्यटकांची पाठ! 10 कोटींचा खर्च पाण्‍यात; बससेवासुद्धा बासनात

Mayem Lake Goa: गोव्‍यातील एक जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या आणि ‘या...या, मया या’ गीतामुळे सर्वदूर प्रसिद्ध पावलेल्या मये तलावाला सध्या वाईट दिवस आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: गोव्‍यातील एक जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या आणि ‘या...या, मया या’ गीतामुळे सर्वदूर प्रसिद्ध पावलेल्या मये तलावाला सध्या वाईट दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांनी या तलावाकडे पाठ फिरवली आहे. त्‍यामुळे या पर्यटनस्थळाला गतवैभव कधी मिळणार, याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

सध्या मये तलावावर सामसूम दिसून येत आहे. यंदाचा पर्यटन हंगाम सुरू झाला तरी अद्याप या तलावातील बोटिंग सुविधा बंद आहे. दुसऱ्या बाजूने ‘बंजी जम्पिंग’ सुविधा मात्र सुरू आहे. त्‍याससुद्धा क्वचितच पर्यटकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, तलाव परिसरातील काही व्यावसायिकांनी आमदार प्रेमेंद्र शेट यांची भेट घेऊन तलावाची सद्यःस्थिती आणि आपली कैफियत त्यांच्या कानावर घातली आहे.

एक काळ म्हणजेच सुमारे २५ वर्षांपूर्वी मये तलावावर स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी दिसून यायची. मात्र कालांतराने या तलावाला ग्रहण लागले आणि हळूहळू पर्यटकांसह स्‍थानिकांनीही या तलावाकडे पाठ फिरवली. त्‍यास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तत्कालीन आमदार स्व. अनंत शेट यांच्या पुढाकारातून तेथे विकसित कामाचा प्रस्ताव पुढे आला.

दहा कोटींचा खर्च पाण्‍यात?

गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे सुमारे दहा कोटी खर्चून काम करून या तलावाला नवी झळाळी देण्यात आली. परंतु पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नसल्याने या तलावाला अजूनही ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत. चार वर्षांपूर्वी विकासकामाचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर अपवाद सोडल्यास या सामसूमच दिसून येते.

बोटिंग बंदच

मये तलावाची जलसफर घडावी म्हणून बोटिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र यंदा अजून तरी ती बंदच आहे. पावसाळ्यापूर्वी बोटिंग सुविधा बंद करण्यात आली होती. जवळपास आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे ‘पर्यटनस्थळ दर्शन’अंतर्गत दोन वर्षांपूर्वी मये तलावावर पर्यटक बससेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेमुळे पर्यटनाला बहार येण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र काही दिवसांनंतर ही योजना फसली आणि बससेवा बंद पडली. पर्यटकांनी पाठ फिरवल्‍यामुळे मये तलाव परिसरातील स्थानिकांचा व्यवसायही संकटात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

SCROLL FOR NEXT