shop
shop dainik gomantak
गोवा

सासमोळे बायणा येथे मटका व्यवसाय तेजीत

दैनिक गोमन्तक

वास्को : सासमोळे बायणा येथील शेवटच्या बसस्थानकाजवळ मटका व्यवसाय तेजीत सुरू आहे. तसेच या प्रकरणी येथील नागरिकांनी पालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांना तक्रार केली असून पालिकेच्या परवान्याशिवाय बेकायदेशीर गाडा थाटून विविध घरगुती सामान विक्री केली जात असल्याचेही नागरिकांनी मुख्याधिकारी यांना सांगितले आहे. मात्र तक्रार केली असून सुद्धा या गाड्यावर अजून कारवाई करण्यात आली नसल्याने लोक संभ्रमात पडले आहे. (Matka business started at Sasmole Bayana)

वास्को शहरात तसेच इतर भागात बेकायदेशीर हातगाडे तसेच इतर व्यावसायिक दुकानांना उत आला आहे. तर जास्तीत जास्त बिगर गोमंतकीय हे बेकायदेशीर गाडे थाटून आपल्या मर्जीनुसार कारभार चालवत आहे. त्यांच्या कारभारावर पालिका मात्र अजून पर्यंत सुस्त असून त्यांच्यावर कारवाई (Action) करण्यास धजावत असल्याचे बोलले जाते. यात काहीजण गाडे स्वतःच चालवतात तर काहींनी सदर जागा बळकावून बेकायदेशीर बिगर गोमंतकीयांना चालावयास दिले आहेत. तसेच ज्यांनी ही जागा बळकावली आहे ते मात्र सरकारी नोकरी (Job) करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिका मुद्दामून त्यांना शह देत आहे का असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

दरम्यान सासमोळे बायणा वास्को येथील शेवटच्या बस थांब्यावर (bus stop) अनिल केवत या दुकानदाराने बेकायदेशीररीत्या दुकान थाटले आहे. तसेच येथे सर्व प्रकारचे घरगुती वस्तू तसेच भाजी व इतर सामानाची विक्री तो करत आहे. इतकेच काय तर तो येथे बेकायदेशीर मटका घेत असून तो तेजीत सुरू आहे. सदर माहिती कलीम फुर्तादो याने माहिती हक्क कायद्यांतर्गत मिळवली असून या दुकानाला पालिकेचा परवाना (License) नाही, तसेच पालिकेने त्या दुकानदारांना कोणत्याही प्रकारचे परवाने दिलेले नाहित. त्यामुळे सदर दुकान बेकायदेशीररीत्या थाटण्यात आले असल्याचे सिद्ध झाले आहे.

दरम्यान या विषयी पालिका मुख्याधिकारी जयंत तारे यांनी सदर दुकानदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवून दुकानाचे परवाने इतर कागदपत्र पालिकेत आणून दाखवण्यास सांगितले असता त्यांच्याकडे सदर दुकानाविषयी काहीच कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार मुख्याधिकारी (Chief Officer) तारी यांनी तीन मार्च रोजी तीन दिवसांच्या आत पुरावे सादर करण्याची मुभा दिली होती. मात्र आज २४ तारीख उजाडली तरी सदर दुकानदार दुकानाविषयी कागदपत्रे सादर करू शकला नाही.तसेच त्या दुकानावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने येथील नागरिक संभ्रमात पडले आहे. तसेच पालिका या गाडे धारकाला क्षय देत नाही ना अशीच प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तेव्हा सदर गाड्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT