Salaulim Dam DIP
गोवा

Salaulim Dam: साळावली धरणावर तुफान गर्दी; वाहनांच्या रांगा, मार्गावर वाहतूक खोळंबली

अजूनही धरणाच्या मार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

Salaulim Dam: दक्षिण गोव्यातील साळावली धरणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धरणाचे रूप पाहण्यासाठी आज स्थानिक रहिवासी, पर्यटकांनी मोठी गर्दी केली.

धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून, मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. अजूनही धरणाच्या मार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दक्षिण गोव्यातील साळावली धरणाचे आकर्षण पर्यटकांसह गोव्यातील नागरिकांना देखील आहे. पावसाळ्यात जेव्हा अर्धाकृती सांडव्यातून पाणी खाली पडते ते पाहण्यासाठी अनेकजण धरणाला भेट देत असतात. नुकत्याच झालेल्या पावासाळी अधिवेशनात मंत्री सुभाष शिरोडकरांनी धरणावर विद्युत रोषणाई करणार असल्याची माहिती दिली होती.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर धरणावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगी रंगाचे धरणाचे लोभस रूप पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हजेरी लावली. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावल्याने मार्गावर वाहतूक कोंडी झालीय.

Salaulim Dam

अंजुणे धरणावरही तिरंगी रोषणाई

राज्यातील अंजुणे धरणावरही तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ वन आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शेअर केला आहे. तिरंगी रंगात धरणातून कोसणाऱ्या पाण्याचा व्हिडिओ आकर्षक दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT