Mayem Vainginim Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Mayem Vainginim Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

House Room Gutted In Fire At Mayem: वायंगिणी-मये येथे एका घराला आग लागून घरातील सुवर्णालंकारासहीत किमती सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत ३० लाखांहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem Vainginim Fire Incident

डिचोली: वायंगिणी-मये येथे एका घराला आग लागून घरातील सुवर्णालंकारासहीत किमती सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना काल (शनिवारी) रात्री उशिरा पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत ३० लाखांहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, असे रंगनाथ गावकर यांनी सांगितले.

वायंगिणी येथील भर लोकवस्तीत रंगनाथ गोविंद गावकर यांच्या घराच्या वरच्या माळ्यावरील खोलीत ही आग लागली. आगीची घटना घडली, त्यावेळी खोलीत कोणीच नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आल्याने संभाव्य दुर्घटना टळली. ही आग नेमकी कशी लागली, त्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र ''शॉर्टसर्किट'' मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी रात्रीच वायंगिणी येथे जावून घटनेची पाहणी केली.

स्थानिक वायंगिणीमधील लोकांवर आकांत कोसळला होता. लागलीच डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. दलाचे जवान घटनास्थळी पोचेपर्यंत मोठ्या संख्येने जमा झालेल्या वाड्यावरील लोकांनी मदतकार्य हातात घेतले. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न करुन आग नियंत्रणात आणली.

आग विझवण्यासाठी दोन बंब वापरावे लागले. दलाचे लिडींग फायर फायटर व्ही. डी. गावकर यांच्या नेतृत्वाखाली चालक ऑपरेटर संदीप परब आणि श्यामसुंदर पाटील यांच्यासह रामचंद्र एकावडे, विशांत वायंगणकर, सुभाष माजीक, प्रदोष मोहन आणि हर्षद सावंत या जवानांनी मदतकार्य केले. ड्युटीवर नसलेले मये येथील लिडींग फायर फायटर राजन परब यांनीही स्थानिकांसह मदतकार्य केले.

सुवर्णालंकार वितळले

रंगनाथ गावकर यांच्या घराच्या तळमजल्याच्या दुरुस्ती कामानिमित्त घरातील किमती सामान घराच्या वरच्या माळ्यावरील खोलीत ठेवण्यात आले होते. याच खोलीला रात्री अचानक आग लागली. आगीचा भडका उडाल्याने खोलीतील सामान बाहेर काढणे शक्य झाले नाही. या आगीत कपाटात ठेवण्यात आलेले रंगनाथ गावकर यांच्या बहिणीचे दागिने वितळून गेले. बहिणीच्या लग्नासाठी दागिने करुन ठेवले होते. दागिन्यांसह अन्य किमती वस्तू जळून खाक झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT