Married lady committed Suicide Dainik Gomantak
गोवा

कोलव्यात विवाहित महिलेनं घेतला गळफास

मृतदेहाशेजारी कोणतीही चिठ्ठी न आढलल्याने आत्महत्येचं कारण गुलदस्त्यात

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोलवा परिसरात एका विवाहित महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. कोलव्यातील वार्ड क्रमांक 4 मधील 33 वर्षीय महिनेनं आत्महत्या का केली याचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. (Married lady committed Suicide News Updates)

मडगावमध्ये कोलवा (Colva) परिसरातील 33 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेतला आहे. मंगळवारी महिलेने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार महिलेनं स्वत:ला बेडरुममध्ये बंद करुन घेतलं. आतून दरवाजा बंद करत ओढणीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेतला. महिलेला पंख्याला लटकलेलं पाहून कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली काढला. महिलेच्या मृतदेहाला दक्षिण गोवा जिल्हा (South Goa) रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. याठिकाणी हा मृतदेह ठेवण्यात आला असून त्याची उत्तरीय तपासणीही केली जाणार आहे. पंचनाम्यावेळी महिलेच्या मृतदेहाशेजारी कोणतंही पत्र सापडलं नाही. त्यामुळे महिलेनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी (Police) पुढील तपास सुरु केला असून कुटुंबीयांची चौकशीही केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्याच्या व्यावसायिकाला 'मिरची' झोंबली! दुबईत निर्यातीच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक, पुण्यातील एकावर गुन्हा दाखल

Marathi Official Language: "मराठी राजभाषा झालीच पाहिजे"! डिचोलीत महिलांचा जयजयकार; धालो, फुगडी, दिंडीतून व्यक्त केला निर्धार

बर्च प्रकरणानंतर झारखंडला पळून गेलेला संशयित सापडला, महिन्यानंतर ‘ऑपरेशनल मॅनेजर’ ताब्यात; महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता

Tuyem Hospital: '100 कोटी खर्चून बांधलेले हॉस्पिटल का सुरु नाही'? पेडण्‍यात उद्रेक; तुये इस्पितळ कृती समितीचे साखळी उपोषण

Chimbel Protest: चिंबलवासीयांचा आक्रोश! आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंचांच्या घरांवर मोर्चा; युनिटी मॉलविरोधात फुंकले रणशिंग

SCROLL FOR NEXT