Margaon Municipality : मडगाव नगरपालिका कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या ठेवल्या होत्या, त्यातील बहुतांश मान्य करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी या प्रतिनिधीला दिली. संघटनेने कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनेक भत्त्यांमध्ये वाढीची मागणी केली होती. त्याप्रमाणे फ्लॅग अलावन्समध्ये 200 रुपयांची वाढ करुन 2200 रुपयांवरुन 2400 रुपये करण्यात आला आहे.
शिवाय वैद्यकीय भत्त्यांमध्ये एकदम 1500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता मडगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांना 7500 रुपयांवरुन 9000 रुपये वैद्यकीय भत्ता मिळणार आहे. युनिफॉर्म भत्ता 4500 वरुन 4800 रुपये, युनिफॉर्म धुण्यासाठीच्या भत्त्यात 900 वरुन 1000 रुपये, कचरा भत्ता 1500 वरुन 2000 रुपये व नगरपालिका वाहन चालकाला भत्ता 800 वरुन 1000 रुपये पर्यंत वाढविण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांत वाढ केली आहे खरी पण त्याच बरोबर कर्मचाऱ्यांकडून सर्व नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. जो कोणी कामचुकारपणा करेल किंवा नियमीत युनिफॉर्म वगैरे घालणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा नगराध्यक्षांनी दिला आहे.
नगरसेवकांच्या मानधनातही वाढ
राज्य सरकारने गोव्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व नगराध्यक्षांच्या मानधनातही वाढ केली आहे. यापूर्वी नगरपालिका वर्ग ए, बी, सी वर्गच्या नगराध्यक्षांना मासिक अनुक्रमे 12875, 11475 व 10800 रुपये एवढे मानधन मिळत होते. सरकारने ते वाढवून आता अनुक्रमे 25000, 22000 व 20000 रुपये केले आहे. शिवाय सर्व नगरपालिकेच्या नगरसेवकांचे मानधन 18000 रुपये करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.