Goa Mango Market Prices Dainik Gomantak
गोवा

Goa Mango Rates: आंब्याची आवक वाढली! बाजारात विक्रेत्यांची गर्दी, काय आहेत दर? जाणून घ्या..

Goa Mango Prices: मडगावच्या पिंपळकट्ट्यावर पहाटे ४ वाजल्यापासून घाऊक आंबे विक्रेत्यांचा बाजारच भरलेला असतो. दर सामान्य नागरिकांना न परवडणारे आहेत.

Sameer Panditrao

सासष्टी: एप्रिल महिन्यामध्ये आंबे विक्रीस येण्यास सुरवात होत असते. मडगावच्या पिंपळकट्ट्यावर पहाटे ४ वाजल्यापासून घाऊक आंबे विक्रेत्यांचा बाजारच भरलेला असतो. हा बाजार गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू झालेला आहे. आज सकाळी पाहणी केली, तेव्हा आंब्याची आवक वाढलेली दिसली. मात्र, दर सामान्य नागरिकांना न परवडणारे आहेत.

मडगावात घाऊक आंबे बाजार सुरू झाला की वास्को, फोंडा, सासष्टी तालुक्यांतील वेगवेगळ्या गावांतील किरकोळ आंबे विक्रेते गर्दी करतात व आंबे विकत घेण्यात त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली दिसते.

एका आंबे विक्रेत्याने सांगितले, की यंदा पाऊस पडल्यामुळे आंब्यांचे पीक कमीच आहे. मानकुराद आंबा मे महिन्यापर्यंतच उपलब्ध असेल.

मुसराद आंबे एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरवातीला येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या एका विक्रेत्याने सांगितले, की यंदा मानकुराद आंब्याचे पीक खूप कमी आहे. सध्या चांगल्या प्रतीचा मानकुराद आंबा १० ते १५ हजार रुपये शेकडा असा आहे. यंदाच्या आंब्याचा मोसम अनिश्र्चित असल्याचे त्याने स्पष्ट केले. त्याने पुढे सांगितले की, पाऊस पडल्यामुळे झाडावर चढायला मजूर तयार होत नाहीत.

सध्या किरकोळ विक्रेते १४०० ते १८०० रुपये डझन या अशा दरात आंब्यांची विक्री करीत आहेत. चांगल्या प्रतीचा आंबा बाजारात २००० रुपये डझन अशा दरातही विकला जात आहे.

मडगावातील आंब्यांचे रविवारचे दर

मानकुराद

१४०० ते १८०० रुपये डझन

१० ते १५ हजार रुपये शेकडा

मुसराद

१० ते १२ हजार शेकडा

गोवा केसर

४ हजार शेकडा

शिंदुरी

२ ते ३ हजार रुपये शेकडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Comeback: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याचं होणार कमबॅक; चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Mitchell Starc Record: रेकॉर्ड ब्रेक! मिचेल स्टार्कनं रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये ठरला सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा गोलंदाज

FC Goa vs FC Arkadag: एफसी गोवाची झुंजीनंतर हार, एफसी अर्कादाग संघाचा 3-0 दणदणीत विजय

Congo Ebola Outbreak: कांगोत इबोला व्हायरसचा हाहाकार! 20 दिवसात 1000 जणांचा मृत्यू, 4000 हून अधिक लोक मृत्यूच्या दाढेत; 10 वर्षांतील सर्वात मोठा उद्रेक

Shravan Month: क्षणात सर, क्षणात सोनेरी ऊन अन् चहूकडे हिरवाईचा साज! निसर्गसौंदर्य आणि सणांची पवित्र अनुभूती देणारा श्रावण पुन्हा अवतरला

SCROLL FOR NEXT