Margao Fish Market, Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगाव मार्केटमधील बेकायदेशीर कामे थांबवा! मच्छीमार, बोटमालकांची पिळवणूक होत असल्याचा दावा, आमदार सरदेसाईंची घेतली भेट

Margao SGPDA Fish Market: विजय सरदेसाई यांनी सांगितले, की एसजीपीडीएने शुल्क दुप्पट केल्याचा अधिकृत निर्णय कधी घेतल्याचे आपल्याला आठवत नाही.

Sameer Panditrao

सासष्टी: मडगाव येथील एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटला सध्या कोणीच वाली नाही अशा पद्धतीने काम चालू आहे. या मार्केटमध्ये पारंपरिक मच्छीमार व गोमंतकीय बोटमालकांची पिळवणूक चालू आहे. त्यामुळे आज वास्को ते बेतुल या किनारी भागातील सर्व पारंपरिक मच्छीमार व बोटमालकांनी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेतली व त्यांच्याकडे यासंदर्भात चर्चा केली.

विजय सरदेसाई यांनी सांगितले, की एसजीपीडीएने शुल्क दुप्पट केल्याचा अधिकृत निर्णय कधी घेतल्याचे आपल्याला आठवत नाही. सरकारने याकडे जातीने लक्ष पुरवून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यापूर्वी घाऊक मासळी विक्रेत्यांची अशीच पिळवणूक करण्यात येत होती. आता त्यांनी पारंपरिक मासळी विक्रेत्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. एसजीपीडीए मार्केटमधील किरकोळ मासळी विक्रेत्यांसाठी सोपो शुल्कात वाढ केली आहे.

सोपो गोळा करणाऱ्या कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी निविदा काढण्यास एसजीपीडीए चालढकल करीत आहे. याचे कारण ही निविदा प्रक्रिया तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही, असेही सरदेसाई यांचे म्हणणे आहे. यावेळी जुझे फिलिप डिसोझा, सावियो डिसिल्वा, पेले फर्नांडिस उपस्थित होते.

पारंपरिक मच्छीमार व बोटमालकांनी एसजीपीडीएच्या सदस्य सचिवांचीही भेट घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी एसजीपीडीएचे अध्यक्ष व वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी १० एप्रिल रोजी भेटण्याची वेळ दिली आहे.

खंडणी घेण्याचा प्रकार

सध्या या मार्केटमध्ये खंडणी घेणे चालू असून शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर एसजीपीडीए व नगरपालिकेचे दोन्ही कंत्राटदार सोपो गोळा करतात, अशी तक्रार पारंपरिक मच्छीमार व बोटमालकांनी आमदार विजय सरदेसाई यांच्याकडे मांडली.

‘...तर मार्केट चालू देणार नाही’

जर हे शुल्क कमी केले नाही किंवा खंडणी बंद केली नाही व आम्हाला मार्केटमध्ये वावरण्यास मोकळीक दिली नाही, तर आम्ही हे मार्केट चालू देणार नाही, असा इशारा पारंपरिक मच्छीमार व बोटमालकांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT