Light Bill Scam Dainik Gomantak
गोवा

Light Bill Scam : गैरहजर संशयितांविरोधात वॉरंट : वीज बील घोटाळा

Light Bill Scam : सात साक्षीदारांनाही पुन्हा समन्स

गोमन्तक डिजिटल टीम

Light Bill Scam :

मडगाव, वीज बील सवलत घोटाळा प्रकरणातील संशयित राधाकृष्‍ण हा आज न्‍यायालयातील सुनावणीसाठी गैरहजर राहिल्‍याने खास न्‍यायालयाचे न्‍यायाधीश इर्शाद आगा यांनी त्‍याच्‍या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

या प्रकरणी मार्मुगाव स्‍टील्‍स लिमिटेड या कंपनीच्‍या प्रतिनिधीविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र नंतर त्‍यांचा वकील न्‍यायालयात हजर झाल्‍याने हे वॉरंट रद्द करण्‍यात आले.

एका साक्षीदाराने समन्स घेण्यास नकार दिल्याने त्याच्‍या विरोधात न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केला. याशिवाय सात साक्षीदारांना नव्याने समन्स पाठवण्यात आलेले आहेत.

मंत्री मावीन गुदिन्‍हो यांचा सहभाग असलेल्‍या या घोटाळा प्रकरणात आज न्‍या. आगा यांच्‍या समोर सुनावणी चालू होती. मागच्‍यावेळी समन्स पाठवलेल्या आठ साक्षीदारांपैकी तिघांचा मृत्यू झाला असून एकाचा समन्स मागे आला आहे, अशी माहिती न्‍यायालयाला देण्‍यात आली.

कथित वीज घोटाळाप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा विशेष न्यायालयात शुक्रवारी सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीला ते उपस्थित नव्हते. यापूर्वी आठ साक्षीदारांना साक्षीदारांनी सरकारी क्वार्टर्स सोडल्याने त्यांचे पत्ते बदलल्याने समन्स माघारी आले.

वीज खात्याकडे व वित्त विभागाकडे पत्त्यांची मागणी करण्यात करत पुन्हा समन्स बजावण्यात आलेले होते. यातील एका साक्षीदाराने समन्स घेण्यास नकार दिला, त्याला जामीनपात्र वॉरंट पाठवण्यात आले.

पुढील सुनावणी १ रोजी

संशयित राधाकृष्णसह याला उपस्थित राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT