Margao Ward No 10 Locals Demand Urgent Garbage Clearance Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगावात कचराफेकूंकडे दुर्लक्ष; कारवाईबाबत पालिकेची अनास्था

कचरा फेकताना सापडल्‍यास 5 हजार रुपये दंड

दैनिक गोमन्तक

Margao Garbage Issue: मडगाव शहरात रस्‍त्‍याच्‍या बाजूला असलेल्या ब्‍लॅक स्‍पॉटवर कचरा फेकणे हे नित्‍याचेच झाले आहे. या ठिकाणी कचरा फेकू नये. फेकल्‍यास पाच हजार रुपये दंड आकारण्‍यात येईल, असे फलक पालिकेच्‍या वतीने लावले जातात.

मात्र, कचराफेकूंवर कारवाई करतो कोण आणि कारवाईला घाबरतो कोण, अशी स्‍थिती सध्‍या मडगावात झाली आहे.

बोर्डा भागात अशाच प्रकारे कचरा टाकला जात असल्याकडे नगरसेवक वितोरीन फर्नांडिस यांनी लक्ष वेधले असून नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन केले आहे.

पालिकेडून अनेक ठिकाणी फलक लावले आहेत; परंतु उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई मात्र होत नाही. उघड्यावर कचरा फेकण्यास काही महिन्‍यांपूर्वी स्‍थानिकांनीच मनाई केली होती. तसेच संबंधित व्‍यक्‍तीला कचरा गोळा करून घेऊन जाण्‍यास सांगण्‍यात आले होते.

कारवाईत सातत्य हवे

रस्‍त्‍याच्‍या बाजूला कचरा फेकताना एखादी व्‍यक्‍ती सापडल्‍यास पालिका त्‍याच्‍याकडून ५ हजार रुपये दंड आकारू शकते. आतापर्यंत अनेकजण कचरा फेकताना सापडले असून त्‍यांच्‍याकडून मडगाव पालिकेने पाच हजार रुपये दंड वसूल केला आहे. असा दंड वसूल करण्‍याचा अधिकार मडगाव पालिकेला आहे.

मात्र, धडक कारवाई करण्यास मडगाव पालिका फारशी उत्सुक नाही असे दिसून येते. मात्र, शहराला गलिच्छ स्वरूप येत असून नागरिकांना दुर्गंधीही सहन करावी लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT