Margao Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime News: बाणावलीत चोरी; गुन्हा नोंदण्यास पोलिसांचा नकार

कोलवा पोलिस स्थानकावर तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Crime News: मडगाव गोव्यात पर्यटकांना लुटणे आणि मारहाणीच्या घटना वारंवार घडत असतानाच बाणावलीत एका रिसॉर्टमध्ये उतरलेल्या पर्यटकांचा चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असून या संबंधी कोलवा पोलिस स्थानकावर तक्रार देण्यास ते गेले असता पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यासही नकार दिला, असा आरोप शिवांगी त्रिपाठी या महिलेने केला आहे.

या संबंधी शिवांगी त्रिपाठीने ट्विटरवरून घटनेची माहिती प्रसृत केली आहे. सदर महिलेचे पती कामकाजासाठी बाणावली येथील ग्रँड रॉयल पाम्स रिसॉर्टवर वास्तव्यास होते.

रिसॉर्टवरील रूममध्ये ते झोपलेले असताना अज्ञाताने त्यांच्या खोलीत येऊन कॅमेरा, लॅपटॉप आणि आयफोन पळवल्याचे त्या महिलेने ट्विट मध्ये म्हटले आहे. या सामानाची अंदाजे किंमत ४ लाख असल्याचेही नमूद केले आहे.

विशेष म्हणजे या घटनेची खबर जेव्हा कोलवा पोलिस स्थानकात ते देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना चोरीसाठी एफआयआर देखील दाखल करून घेण्यास नकार दिला.

यामुळेच गोवा किती सुरक्षित आहे, असा सवाल तिने सोशल मीडियातून विचारला आहे. दरम्यान, घटनेची दखल उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

कोकणात 22 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय मुलीचा खून का केला? घटनास्थळी सापडली नायलॉनची दोरी, कात्री आणि सॅनिटरी पॅड

SCROLL FOR NEXT