Goa CAN awareness Dainik Gomantak
गोवा

Margao: सीट बेल्ट, हेल्मेट वापरासाठी 'गोवा कॅन'चे जागृती अभियान; 50 विद्यार्थ्यांसह स्वयंसेवकांचा सहभाग

Goa CAN awareness: कदंब बस चालक सीट बेल्ट न घालताच (नुवे -मडगाव मार्गावर) बसेस चालवत असल्याचे ‘गोवा कॅन’ व कार्मेल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: कदंब बस चालक सीट बेल्ट न घालताच (नुवे -मडगाव मार्गावर) बसेस चालवत असल्याचे ‘गोवा कॅन’ व कार्मेल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

गोवा कॅन आणि कार्मेल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कन्झ्युमर वेल्फेअर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी नुवेतील विद्यालया जवळ ‘रस्ता सुरक्षितता जनजागृती उपक्रम’ राबविण्यात आला. हा उपक्रम ‘गोवाकॅन’च्या ११ दिवसीय रस्ता सुरक्षितता जनजागृती अभियानाचा एक भाग होता.

या उपक्रमात सुमारे ५० विद्यार्थी आणि गोवाकॅन स्वयंसेवकांनी भाग घेतला. रंगीबेरंगी ध्वज, फलक घेऊन वाहन चालकांना आयएसआय मार्क असलेले हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांच्या हातातील फलकांवर ‘सावकाश चालवा, जीव वाचवा,’ ‘गती कमी करा, दुर्देवी अपघात टाळा,’ ‘मद्य प्राशन करून, वाहन चालवू नका’ असे संदेश होते. या जनजागृती उपक्रमात अनेक तरुण हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना तसेच कदंब बसचालक सीट बेल्ट न घालता बसेस चालवत असल्याचे आढळून आले आहे.

हा उपक्रम गोवा कॅनचे समन्वयक रोनाल्ड मार्टिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. डायना मारिया रॉड्रिग्स, ई कुतिन्हो यांनी सहकार्य केले. मडगाव वाहतूक उपनिरीक्षक हिरालाल एस. गावडे, हवालदार संदेश गावकर आणि वाहतूक खात्याचे एन्फोर्समेंट (दक्षिण) पर्सी कुतिन्हो आणि चार्ल्स फारिया यांनी उपस्थित राहून उपक्रमाला पाठिंबा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deposit Refund Scheme: स्वच्छ गोव्यासाठी ‘डीआरएस’ योजना गरजेची! CM सावंतांनी मांडली योजना; दरवर्षी कचऱ्यावर 600 कोटींचा खर्च

VIDEO: रांगाच रांगा, गॅस सिलिंडरसाठी धावाधाव; गर्दी हातघाईवर, पोलिसांना केले पाचारण

Bhausaheb Bandodkar: 'भाऊसाहेब बांदोडकर यांच्यामुळे गोव्याने सर्वच क्षेत्रांत यशस्वी झेप घेतली'; ढवळीकरांचे गौरवोद्गार

Fiscal Health Index: गोव्‍यासाठी खूशखबर! आर्थिक आरोग्‍य निर्देशांकात यंदा दुसरा क्रमांक; CM सावंतांनी केला अहवाल सादर

Goa Politics: खरी कुजबुज; फोंडा पोटनिवडणूक अजूनही ‘वेटिंग’वर

SCROLL FOR NEXT