Rumdamol Dovorlim News Dainik Gomantak
गोवा

Margao rumdamal dovorlim : पार्क केलेल्‍या गाड्या फोडल्‍याने वादग्रस्त रुमडामळ पुन्‍हा चर्चेत

रात्री फिरणाऱ्या टाेळक्‍याकडून गुन्‍हा : पोलिस गस्‍त वाढविण्‍याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

पंचायत सदस्‍यावर झालेला खुनी हल्‍ला आणि त्‍यानंतर या प्रकरणाला मिळालेले धार्मिक वळण यामुळे तंग झालेले रुमडामळ काल पुन्‍हा एकदा चर्चेत आले. येथील अंजुमन हायस्‍कूलच्‍या ग्राऊंडजवळ पार्क करून ठेवलेल्‍या तीन गाड्यांच्‍या काचा फोडण्‍याची घटना काल रात्री घडली असून या भागात रात्रीच्‍यावेळी फिरणाऱ्या टोळक्‍याने हे काम केल्‍याचा आरोप केला जात आहे.

मुद्दामहून या भागातील शांतता बिघडविण्‍यासाठी हे कृत्‍य केले असावे,अशी शंका या भागातील पंचायत सदस्‍य उमरान पठाण यांनी व्यक्त केली असून या भागात रात्रीच्‍यावेळी पोलिस गस्‍त वाढवावी,अशी मागणी केली आहे.

अब्‍दुल कादर यांच्‍या मालकीच्‍या या गाड्या असून गाड्याच्‍या कांचावर दगड घालून त्‍या फोडल्‍याचे दिसून आले आहे. यामुळे त्‍या गाड्यांचे बरेच नुकसान झाले आहे. यातील दाेन गाड्यांच्‍या काचा फोडण्‍यात आल्‍या असून तिसऱ्या गाडीची किरकोळ तोडफोड झाली आहे.

रुमडामळ भागात रात्रीच्‍यावेळी काही टोळकी फिरतात. हे सर्व युवक रुमडामळच्‍या बाहेरच्‍या भागातील असून आपल्‍या मोटर सायकलींवरून रात्रभर ते या भागात फिरून धिंगाणा घालतात. याच टोळक्‍याने ही तोडफोड केली असावी, असा संशय पठाण यांनी व्‍यक्‍त केला. या संबंधी मायणा-कुडतरी पोलीस स्‍थानकात तक्रार नाेंद केली आहे. पोलिसांनी रात्रीच्‍यावेळी रुमडामळ भागात गस्‍त वाढवावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT