Margao Railway Station Dainik Gomantak
गोवा

Margao Railway Station: मडगाव कोकण रेल्वेस्थानकाचा होतोय कायापालट...

12 कोटी खर्च : सुशोभीकरणावर भर; प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या सुखसोयी : बबन घाटगे

दैनिक गोमन्तक

Margao Railway Station: मडगावचे कोकण रेल्वेस्थानक हे गोव्यातील एक मोठे रेल्वे जंक्शन. त्‍यामुळे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनसह केंद्र सरकारचेही त्याकडे बारकाईने लक्ष असते. या रेल्वेस्थानकावर देशातील जवळजवळ सर्व राज्यांतील प्रवासी येत असतात. त्यामुळे हे स्थानक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर स्थानकाचे सुशोभीकरण करण्यावरही भर दिला जातोय.

कोकण रेल्वे परिसर सौंदर्यीकरणावर सुमारे 12 कोटी रुपये खर्च केल्याचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले. या सौंदर्यीकरणात पार्किग  परिसराचा विकास केला आहे. बसस्‍थानक, टॅक्सीस्‍थानकाच्‍या आतील भागाचे सुशोभीकरण केले आहे.

प्रवाशांसाठी खास लॉंज तयार केला असून त्यात सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहेत. जवळजवळ सहा वर्षांनंतर मडगाव कोकण रेल्वेस्थानकाचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यात आलेय.

शिवाय प्लॅटफॉर्मवर पत्र्यांचे आच्छादन, जैव-शौचालये, मोफत वायफाय सुविधा, प्रवाशांना बसण्यासाठी बेंच, इलेक्‍ट्रिक एक्सावेटर्स आदी व्यवस्था करण्यात आली आहे.  ‘अमृत भारत’ योजनेअंतर्गत मडगाव रेल्वेस्थानकाचा विकास करण्‍यात येत आहे.

विलिनीकरण सोपे नाही : कामत

कोकण रेल्वेचे दुसऱ्या रेल्वे विभागात विलिनीकरण करण्याचा विचार असल्याच्या बातमीसंदर्भात आमदार दिगंबर कामत यांना विचारले असता ते म्हणाले की, ते तेवढे सोपे नाही. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ या चार राज्यांचा समावेश आहे.

त्यामुळे या चारही राज्यांची परवानगी घेतल्याशिवाय तसे विलिनीकरण शक्य नाही. रोहा ते मडगावपर्यंतचा मार्ग मध्य रेल्वेत व मडगाव ते मंगळुरुपर्यंतचा मार्ग दक्षिण-पश्र्चिम रेल्वेमध्ये विलिनीकरण करणार असल्याचे वृत्त पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ भक्कम स्थितीत! दररोज 84 विमानांची ये-जा, 13 हजार प्रवाशांची हाताळणी; विमानतळाला 137 कोटींचा नफा

Tarun Tejpal: कधी सत्ताकेंद्रांना प्रश्न, आता कारागृहाचे नियम! कोलवाळमध्ये तेजपालचा दिवस कसा जातो? शेजारी लुथरा बंधू आणि अजय गुप्ता

Passport New Rules: पासपोर्टचे नियम अन् फी बदलली, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; परदेश प्रवासापूर्वी ही बातमी नक्की वाचा

IND vs AFG: 18 चौकार, 22 षटकार अन् 229 धावा! अभिषेक शर्मा ठरला T20 मालिकेचा 'किंग'; टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा करिष्मा

खरी कुजबुज: भाजपचा शिस्तीचा बडगा कोसळला!

SCROLL FOR NEXT