Goa Housie Dainik Gomantak
गोवा

Margaon: राय येथे फुटबॉल सामन्यावेळी सुरु असलेल्‍या हाऊझी केल्या बंद, पोलिसांकडून आयोजकांना कारवाईची तंबी

Housie Game Goa: राय येथे फुटबॉल सामन्यावेळी आयोजित केलेल्या हाऊझीवर मायणा-कुडतरी पोलिसांनी कारवाई करत त्‍या बंद केल्‍या. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी हाऊझी आयोजकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Sameer Amunekar

मडगाव: राय येथे फुटबॉल सामन्यावेळी आयोजित केलेल्या हाऊझीवर मायणा-कुडतरी पोलिसांनी कारवाई करत त्‍या बंद केल्‍या. पोलिसांच्या पथकानं सासष्टी मामलेतदारांसह कार्यक्रमस्थळी येऊन या हाऊझी बंद केल्‍या.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी हाऊझी आयोजकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच दक्षिण गोव्यात हाऊझीला परवानगी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राय येथे रविवारी फुटबॉल सामन्यादरम्यान हाऊझी स्पर्धा आयोजित केली होती.

पोलिसांनी ती थांबविल्यानंतर अनेक फुटबॉलप्रेमी सरकारी अधिकाऱ्यांवर नाराज झाले. सासष्टी येथील इतर फुटबॉल स्पर्धांच्‍यावेळी हाऊझी सुरू असताना अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, असे फुटबॉलप्रेमी म्हणाले.

राय येथील फुटबॉलप्रेमी जेरॉन कुलासो यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, फुटबॉल क्लबसाठी हाऊझी हे एक महत्त्वाचे निधी संकलन साधन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

Dog Attack: बोगमाळोत कुत्र्याने घेतला पादचाऱ्याचा चावा, रहिवाशाविरुद्ध वास्को पोलिसांत गुन्हा दाखल

Parra: 'आमच्यावरील गुन्हे मागे घ्या'! भूमिका, साखळेश्वर देवस्थान वाद; पर्येतील शेकडो नागरिकांची पोलिस स्थानकावर धडक

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT