Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News : पोलिसांनी रोखला ‘आप’ चा प्रचार; कुडचडेत तणाव

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, आम आदमी पक्षाचा कुडचडे येथे चालू असलेला प्रचार आज पोलिसांसह आलेल्या भरारी पथकाने रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे काही काळ कुडचडे येथील शिवाजी चौकाजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हा गोंधळ चालू असतानाच माध्यम प्रतिनिधी हजर झाल्यावर भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.

आपचे आमदार वेंझी विएगस हे भाषण करत असताना भरारी पथकाचा एक अधिकारी तिथे पोलिस फौजफाट्यासह पोहचला. तुमच्या ध्वनिक्षेपकाचे डेसिबल आवाज किती आहे, असा प्रश्न त्यांनी केला. ही कोपरा बैठक घेण्यासाठी तुम्ही परवानगी घेतली आहे का, अशी चौकशीही त्यांनी केली.

या प्रकाराबद्दल नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना विएगस यांनी हा प्रकारच अजब होता, असे म्हटले. आम्ही अशा प्रकारचा प्रचार संपूर्ण गोव्यात करीत आहोत. आम्हांला इतर कुठल्याही ठिकाणी अशी अडवणूक केली गेली नाही, मात्र आज पहिल्यांदाच आम्हांला अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मग तुम्ही प्रचार का करता?

: शुक्रवारी तिळामला आणि रिवण येथे आम आदमी पक्षाचा प्रचार चालू असताना तुमचा उमेदवार निवडणकीत उभा राहिलेला नाही त्यामुळे तुम्ही प्रचार का करता, असा प्रश्न एका भाजप पदाधिकाऱ्याने फोनवरून विचारला होता. भाजपकडून हे केवळ दबावतंत्र चालू असल्याचे आपचे कार्यकारी अध्यक्ष जर्संन गोम्स यांनी म्हटले आहे.

सत्ताधाऱ्यांचे दाबे दणाणले म्हणूनच...

आतापर्यंत दक्षिण गोव्यातील इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर होत नव्हता, त्यामुळे भाजप नेते स्वस्थ होते. मात्र आज कॅ. विरियतो फर्नांडिस यांचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच त्यामुळेच आता सरकारी यंत्रणा वापरून आमची गळचेपी केली जात असल्याचा आरोप विएगस यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT