Margao Dainik Gomantak
गोवा

Margao: ख्रिसमस दरम्यान दुचाकींवर डल्ला, कोल्हापूर येथील चोरट्याला अटक

तीन दुचाक्या जप्त: आणखी वाहने चोरल्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

ख्रिसमस मोसमात गोव्यात पर्यटकांची गर्दी असते. गर्दीचा फायदा घेत दुचाक्या आणि अन्य चोऱ्या करण्यासाठीं कोल्हापूरहून गोव्यात आलेल्या एकाला मडगाव पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत. अविनाश पाटील असे या चोरट्याचे नाव आहे.

चोरी केलेल्या तीन पैकी दोन दुचाक्या मडगाव येथील गोमंत विद्या निकेतन आणि गांधी मार्केट परिसरातून चोरल्या होत्या तर तिसरी दुचाकी म्हापसा येथे नोंदणी झालेली असून ती नेमकी कुठून चोरली त्याची माहिती अजून पोलीसांना मिळालेली नाही. अशी माहिती मडगाव येथील पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

स्वप्नील अस्नोटीकर या इसमाने 29 डिसेंबर रोजी गांधी मार्केट परीसरात पार्क करुन ठेवलेली आपली दुचाकी कुणीतरी चोरुन नेल्याची तक्रार मडगाव पोलिसात दिली. चोर झालेली मोटर सायकल घेऊन फिरत असताना अविनाश हा चोरटा दिसल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने अन्य दोन दुचाकी देखील चोरी केल्याची कबुली दिली. कोल्हापूरहून मडगाव येथे आल्यावर हा चोरटा वेगवेगळ्या ठिकाणी रहात होता अशी माहिती मिलाली आहे. या चोरट्याला मडगाव न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात सनबर्न ईडीएम फेस्टिव्हल व पर्यटकांना लक्ष्य करून परराज्यातून अनेक मोबाईल चोरांच्या सराईत टोळ्या गोव्यात दाखल होऊन त्यांनी हॉटेलात मुक्काम केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांचे लक्ष्य हाणून पाडत कळंगुट व हणजूण पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत 143 मोबाईल्स जप्त करत तब्बल 48 जणांच्या चार वेगवेगळ्या टोळ्या गजाआड केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT