Goa Crime : गेल्या तीन दिवसांत 48 चोरट्यांना अटक

राज्यात सनबर्न ईडीएम फेस्टिव्हल आणि पर्यटकांना लक्ष्य करून परराज्यातून अनेक मोबाईल चोरांच्या सराईत टोळ्या गोव्यात दाखल झाल्या आहेत.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात सनबर्न ईडीएम फेस्टिव्हल व पर्यटकांना लक्ष्य करून परराज्यातून अनेक मोबाईल चोरांच्या सराईत टोळ्या गोव्यात दाखल होऊन त्यांनी हॉटेलात मुक्काम केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांचे लक्ष्य हाणून पाडत कळंगुट व हणजूण पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत 143 मोबाईल्स जप्त करत तब्बल 48 जणांच्या चार वेगवेगळ्या टोळ्या गजाआड केल्या आहेत.

नववर्षाच्या स्वागताची जोरदार धुम सुरू असताना दुसऱ्या बाजूने किनारी भागात मोबाईल चोरट्यांनी हैदोस घातला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्या आहेत. कळंगुट पोलिसांनी रविवारी आणखी 12 जणांची एक टोळी जेरबंद केली. त्यांच्याकडून 15 लाख रुपये किंमतीचे 55 महागडे मोबाईल जप्त करण्यात आलेत.

शनिवारी मध्यरात्री कळंगुटच्या किनारी भागात नेहमीप्रमाणेच पेट्रोलिंग सुरु असताना परिसरात संशयास्पदरित्या भटकणारे एकूण बारा तरुण पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी घेराव‌ घालीत त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता हे सर्वच्या सर्व सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. तर दुसरीकडे हणजूण पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाईत ठाणे येथील सिराज अहमद शेख (38) याला वागातोर-सनबर्न परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे 9 महागडे मोबाईल सापडले.

Goa Crime
Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्‍नी गोव्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले

पोलीस स्टेशनमध्ये गर्दी

पोलिसांच्या या कारवाईची माहिती कळताच मोबाईल्स चोरीला किंवा हरवल्याच्या तक्रारी देण्यास अनेकांनी कळंगुट आणि हणजूण पोलिस स्थानकात गर्दी केली होती. काहींनी हरवलेला की चोरीला गेलेले मोबाईल्स पोलिस स्थानकात ओळखले असले तर पोलिस प्रक्रियेमुळे त्यांना न्यायालयामधून घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे काहीजण तक्रार देऊन निघून गेले. पहिल्यांदाच गोव्यात मोबाईल चोरट्यांच्या टोळ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात गजाआड करण्याची वेळ आहे.

तीन दिवसांमधील कारवाई

गुरुवार : कळंगुट पोलिस : 12 चोरटे, 41 मोबाईल्स

शुक्रवार : कळंगुट पोलिस : 5 चोरटे, 9 मोबाईल्स

हणजूण पोलिस : 18 चोरटे, 29 मोबाईल्स

शनिवार : कळंगुट पोलिस : 12 चोरटे, 55 मोबाईल्स

हणजूण पोलिस : 1 चोरटा, 9 मोबाईल्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com