Margao

 

Dainik Gomantak 

गोवा

कब्रस्तान प्रकरणात मडगाव नगरपालिका तटस्थ

मुस्लीम संघटना जमिनीवर कब्रस्तान उभारण्याची मागणी करत आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव बाह्य विकास आराखड्यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्याची दोन महिन्यांची मुदत मंगळवारी संपली तर दुसरीकडे सोनसोडो येथील जमीन पूर्ववत कब्रस्तानसाठी दाखविण्यासंदर्भात झालेल्या मागण्यावर मडगाव (Margao) नगरपालिकेने कोणतीच भूमिका न घेता तटस्थ रहाणे पसंत केले.

मिळालेल्या माहितीनुसार, एसजीपीडीएकडे सोनसोडो (Sonsodo) येथील झोन बदल करून तेथे कमी खर्चाची घरबांधणी करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवणारे व ती जमीन पूर्ववत कब्रस्तानसाठी कार्याची मागणी करणारे 4 ते 5 अर्ज आले आहेत. एसजीपीडीए मडगाव नगरपालिकेच्या (Municipality) मागणी खेरीज एकतर्फी हा बदल करूं शकत नाही. कारण सुमारे 30 हजार चौ.मी. असलेल्या या जमिनीची नगरपालिका मालक आहे. पण तरीही या प्रकरणात तिला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. एसजीपीडीए लवकरच या प्रकरणात तिचे मतप्रदर्शन मागणार आहे, कारण झोन बदल करण्याची मागणी करणारे अर्ज आलेले आहेत.

सध्या तरी मडगाव नगरपालिकेने या प्रकरणात कोणतीच भूमिका घेतलेलेली नाही. एकीकडे मुस्लीम संघटना तेथे कब्रस्तान उभारण्याची मागणी करत आहेत. ती जमीन त्यासाठी पुरेशी असल्याचे सांगत आहेत. त्या कारणासाठीच ती संपादलेली होती, याकडेही त्या अंगुली निर्देश करत आहेत. दुसरीकडे पालिका अधिकारी एसजीपीडीए मत मागेल तेव्हा पालिका ते त्यांना कळवील असे सांगत आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी नगराध्यक्ष लिंडन परेरा यांना या संदर्भात टिपणी पाठविली आहे व सोबत पालिकेकडे या संदर्भात आलेले अर्जही जोडले आहेत. मात्र नगराध्यक्षांनी त्यांना पाठविलेल्या उत्तरांत पालिकेने या पूर्वी घेतलेल्या भूमिकेकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT