Margao Municipality Budget Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality Budget : मडगाव पालिकेचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर; ४.८४ कोटींचा अर्थसंकल्प

Margao Municipality Budget : सार्वजनिक आरोग्यासाठी ५१.३८ कोटींची तरतूद

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Municipality Budget :

सासष्टी, मडगाव नगरपालिका कौन्सिलच्या बैठकीत ४.८४ कोटी रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. २

०२४-२५ आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात ७७.७६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल, तर ७२.९२ कोटी रुपये खर्च व नगरपालिकेला सर्वाधिक महसूल ३२.७० कोटी रुपये सरकारला अनुदानातून प्राप्त होईल, तर नगरपालिकेच्या मालमत्तेतून १९.९० कोटी, कर व इतर शुल्कातून १४.९७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल. शिवाय अतिरिक्त ४.५१ व सस्पेन्स महसूल ५.६८ कोटी रुपये नगरपालेकाला मिळतील, असे अंदाजपत्रकात म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्यावर सर्वाधिक खर्च म्हणजे ५१.३८ कोटी व सर्वसाधारण प्रशासनावर १५.३५ कोटी, अतिरिक्त १.८८ व सस्पेन्स खर्च ३.३२ कोटी रुपये दाखविण्यात आलेला आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की, हा नगरपालिकेचा सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असून सर्वच नगरसेवकांनी त्यावर भरपूर चर्चा केली.

नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी गरपालिकेचा अर्थसंकल्प कायद्याप्रमाणे ३१ जानेवारीपूर्वी मांडला पाहिजे हा मुद्दा उपस्थित केला.

बैठकीच्या सुरवातीला आयोध्येत राम मंदीर उभारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव नगरसेवक कामिल बार्रेटो यांनी मांडला.

यावेळी ठरावास पाठिंबा देताना सदानंद नाईक, सगुण नायक, घनश्याम शिरोडकर, राजू नाईक, श्र्वेता लोटलीकर व नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्षपदी बबिता नाईक हिची निवड झाल्याबद्दलही तिचे अभिनंदन करणारा ठराव मंजुर करण्यात आला.

बीएस-४ वाहने बांधण्यासाठी दिली असून ही वाहने रस्त्यावर आणण्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागला. बीएस-४ वाहने घेण्यास जे कारणीभूत आहेत, त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून खर्च वसुल करून घेण्याचा आदेश आपण मुख्याधिकाऱ्यांना दिल्याचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले.

सोनसोडो कचरा प्रकल्पाचा मुद्दा गाजला

सोनसोडो कचरा प्रकल्पात नवीन कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्याचा मुद्दा बराच गाजला. हा प्रकल्प जरी गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीमार्फत घातला जात असला, तरी मडगाव शहराची जी व्याप्ती, लोकसंख्या वाढत आहे त्याचा अभ्यास करून भविष्यासाठी त्या प्रकल्पात तरतूद करावी असा मुद्दा नगरसेवक सगुण नायक यांनी मांडला.

कामचुकार चालकांवर कारवाईचे आदेश

बैठकीत नगरपालिकेच्या वाहनांचे जे कामचुकार चालक आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. जे कर्मचारी गणवेश घालून येत नाहीत, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला ओळखपत्र दिले जाईल या विषयावर बैठकीत चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT