Margao Municipal Ward Dainik Gomantak
गोवा

Margao: एक प्रभाग कमी केल्याने मडगावात राजकीय वादळ! विरोधकांचा सत्ताधारी पक्षावर निशाणा; न्यायालयात जाणार

Margao Municipal Ward: सरकारलाही पालिका निवडणूक घेण्याची इच्छाच नसावी वा आपल्या राजकीय सोयीसासाठी जाणून बुजून प्रभाग कमी केले असावे, असा आरोप गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्षाने केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मडगाव पालिकेचा एक प्रभाग  आगामी पालिका निवडणुकीसाठी कमी केल्याने सध्या मडगावात राजकीय वादळ उठले असून विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाने जाणूनबुजून हे कृत्य  केले असल्याचा आरोप केला आहे.

सरकारलाही  पालिका निवडणूक  घेण्याची इच्छाच  नसावी वा आपल्या राजकीय सोयीसासाठी  जाणून बुजून प्रभाग कमी केले असावे, असा आरोप गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्षाने केला आहे. मडगावात पूर्वी २५ प्रभाग होते, आता त्यात घट होऊन हा आकडा २४ वर आणला आहे.  

या विषयावर स्पष्टीकरण न मिळाल्यास आम्हाला न्यायालयाची दारे ठोठवावी लागतील, असा इशारा विजय सरदेसाई यांनी दिला आहे. विजय सरदेसाई यांनी सरकारच्या एकूण कार्यपद्धतीवर शरसंधान केले आहे. मंत्रिमंडळाने मडगाव पालिकेचे  प्रभाग २५ वरून २७ करण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा अधिवेशनात  यासंदर्भात विधेयक येणार होते.

मात्र, अधिवेशन स्थगित झाल्याने हे विधेयक चर्चेस  येऊ शकले नाही. निवडणुकीसाठी पारदर्शकता असणे गरजेचे आहे. आता प्रभाग कमी केले आहे. कमी केलेला प्रभाग भौगोलिकरित्या  कुठल्या प्रभागात घालणार हे निश्चित नाही. अनुसूचित जाती जमाती, अन्य मागासवर्गीय तसेच महिलांसाठी कुठले प्रभाग आरक्षित केले जाईल याचा काही ठावठिकाणा नाही. त्यामुळे सर्वांचाच गोधळ उडाला आहे. आम्ही यापूर्वी प्रभाग आरक्षणाबाबत न्यायालयात गेलो आहोत. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्ही पालिका निवडणुकीसाठी सज्ज आहोत, असे सांगितले.

नाहक  आरोप :  दिगंबर कामत

 प्रभाग कमी करणे, महिलांसाठी, अनुसूचित जातीजमाती तसेच अन्य मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवणे हे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येते. यात सरकार काहीही हस्तक्षेप करू शकत नाही. पालिका प्रशासन काहीही करू शकत नाही. निवडणूक  आयोग  ही स्वायत्त संस्था आहे. विरोधक  जे आरोप करीत आहेत ते हास्यास्पद व निरर्थक आहेत, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.

मंत्री कामत यांचाच  हात : कुतिन्हो

मडगाव पालिकेचे प्रभाग कमी करण्यामागे सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांचाच हात आहे. पणजी महानगरपालिकेत  एका एका  प्रभागाची  मतदार संख्या कमी असूनही  तेथे ३० प्रभाग आहेत, त्याउलट मडगावात मतदारसंख्या जास्त असूनही प्रभाग का कमी केले जातो. मडगावात अनेकांची नावे मतदार यादीतून  गाळली गेली  आहेत व जे मतदारच नाहीत त्यांची नावे घातली गेली आहेत. यामागे कर्ताकरविता कोण आहे हे मडगावकरही  जाणून आहेत, अशी प्रतिक्रिया मडगाव गट काँग्रेस निमंत्रक  सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT