Surprise inspection By Chairperson Damodar Shirodkar In Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council : गणवेश परिधान न करणाऱ्यांकडून गणवेश भत्ता परत घेणार : शिरोडकर

कर्मचाऱ्यांमधील अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव नगरपालिकेत कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी मुख्याधिकारी बार्रेटो व इतर अधिकाऱ्यांसह अचानक पाहणी केली. या दरम्यान अनेक कर्मचारी पालिकेच्या गणवेश घालत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या बरोबरच अनेक कर्मचारी कामाच्या वेळेत त्यांच्या जागेवर नसल्याचेही निष्पन्न झाले. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा नगराध्यक्ष शिरोडकर यांनी दिला असून जे कर्मचारी गणवेश घालत नाहीत, त्यांचा गणवेश भत्ता परत घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची खात्री करण्यासाठी ही तपासणी करण्यात आली. तपासणीत सहा कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान केला नसल्याचे स्पष्ट झाले असून असे करण्यामागे कोणतेही वैध कारण नाही, या प्रकरणी पुढील निर्णय घेण्यात येणारे असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.

यापूर्वी गणवेश भत्ता देऊनही कर्मचारी नियमांचे कामाच्या वेळेत पालन न करण्याचे आढळल्याच्या घटना पालिकेत नोंदवण्यात आल्या होत्या. या बाबींची गांभीर्याने दखल घेत आकस्मिक पाहणी केली असता नागरिकांचे आरोप खरे ठरले.

शिरोडकर आणि बार्रेटो यांनी प्रशासनाच्या प्रत्येक विभागाला वैयक्तिकरीत्या भेट दिली. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त राहावी, यासाठी यापुढेही अशा तपासण्या केल्या जातील, असा इशारा शिरोडकर यांनी दिला आहे.

नियमित तपासणी होणार

पत्रकारांशी बोलताना शिरोडकर यांनी ड्रेस कोडचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला. ते म्हणाल, त्या सर्व कर्मचाऱ्यांना गैरहजर म्हणून चिन्हांकित केले जाईल आणि भविष्यात गणवेश नसलेले आढळल्यास गणवेश भत्ते वितरित केले जाणार नाहीत.

कर्मचाऱ्यांमधील अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही. कर्मचाऱ्यांनी कौन्सिलच्या नियमांचे पालन केले आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी नियमित तपासणी केली जाईल, असे शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT