Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Goa News: मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी मेलविन वाझ यांनी जाहीर नोटीस काढून नगरपालिकेच्या परिसरात उघड्यावर शौच किंवा लघवी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिलेला आहे

Akshata Chhatre

Margao Municipal Council

मडगाव: मडगाव नगरपालिकेकडून जाहीर केलेल्या नोटिसीनुसार नगरपालिकेच्या परिसरात उघड्यावर शौच केल्यास १०० रुपये दंड तर उघड्यावर लघुशंका केल्याचे आढळल्यास ५० रुपयांचा दंड भरावा लागेल.

मडगाव पालिकेच्या परिसरात उघड्यावर शौच केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात उघड्यावर घाण केल्याचे प्रकार निदर्शनास आलेत. नगरपालिकेच्या क्षेत्रात स्वछता राखण्यासाठी व्यापक उपक्रमांचा एक भाग म्हणून ही सूचना जारी करण्यात आली आहे.

मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी मेलविन वाझ यांनी जाहीर नोटीस काढून नगरपालिकेच्या परिसरात उघड्यावर शौच किंवा लघवी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिलेला आहे.

पहिल्यांदा उघडयावर शौच करण्याचा प्रकार आढळल्यास पालिका १०० रुपयांचा दंड आकारले आणि त्यानंतर असा प्रकार पुन्हा घडल्यास शंभर रुपयांच्या पट्टीत दरवेळी वाढ केली जाईल. तसेच उघड्यावर लघवी करताना आढळल्यास पहिल्यांदा ५० आकारले जातील आणि त्यानंतर हीच बाब पुन्हा घडल्यास दंडाची रक्कम देखील वाढेल.

स्वच्छतेचं पालन व्हावं यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा आणि पालिकेने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र मडगावात सगळ्याच ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने अनेकांकडून यावर टीका करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

SCROLL FOR NEXT