Madgao
MadgaoDainik Gomantak

Madgao News : कुडचडेतील ‘ती’ जाहीर सभा नव्‍हती : वेंझी व्‍हिएगस

Madgao News : आचारसंहितेचा भंग न केल्‍याचा दावा
Published on

Madgao News :

मडगाव, कुडचडे येथील शिवाजी चौकाजवळ जी सभा घेण्‍यात आली होती, ती फक्‍त जागृती सभा हाेती. ती जाहीर सभा नव्‍हती, असा दावा ‘आप’चे बाणावलीचे आमदार वेंझी व्‍हिएगस यांनी त्‍यांच्‍या विरोधात बजावलेल्‍या ‘कारणे दाखवा’ नोटिसीला उत्तर देताना केला आहे.

आपण आचारसंहितेचा कुठल्‍याही प्रकारे भंग केलेला नाही असे त्‍यांनी या उत्तरात म्‍हटले आहे.६ मार्च रोजी कुडचडे येथे ‘आप’ने घेतलेल्‍या सभेला ध्‍वनिक्षेपक वापरण्‍याची परवानगी नव्‍हती.

मात्र, ही सभा घेताना ध्‍वनिक्षेपकाचा वापर करून निवडणूक आचार संहितेचा भंग केल्‍याचा आरोप ठेवून दक्षिण गोव्‍याचे मुख्‍य निवडणूक अधिकारी आश्‍विन चंद्रू यांनी व्‍हिएगस यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. ४८ तासात या नोटिशीला उत्तर द्यावे, असे त्यात म्हटले होते.

Madgao
Goa Cricket Association: खोर्ली इलेव्हनने पटकावले राज्यस्तरीय 'विजेतेपद'; फायनलमध्ये आर्ले क्लबचा उडवला धुव्वा

आज व्‍हिएगस यांनी पक्षाच्‍या पदाधिकाऱ्यांबरोबर जिल्‍हाधिकारी कार्यालयात जाऊन या नोटिशीला उत्तर सादर केले. कुडचडेतील ती सभा फक्‍त जागृती सभा होती. त्‍यासाठी ध्‍वनिक्षेपक नव्‍हे तर साधा स्‍पीकर वापरला होता. त्‍याची क्षमता ५० डेसिबलच्‍या खाली होती. त्‍यामुळे हा आचारसंहितेचा भंग होत नाही, असे त्‍यांनी आपल्‍या उत्तरात म्‍हटले आहे.

भाजप सरकारने ‘इंडिया’ आघाडीचा धसका घेतल्‍यामुळेच विरोधकांवर दबावाचा प्रयत्‍न होत असल्‍याचे व्‍हिएगस पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com