Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council : रद्द झालेल्या मॉडेलची ट्रक खरेदी पालिकेला भोवण्याची शक्यता

24 तासांत माहिती द्या : लेखा परीक्षकांची मडगाव पालिकेला सूचना

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete : वाहतूक खात्याने बीएस 4 टाटा 709 या मॉडेलचे ट्रक वाहतूक खात्याने रद्द केले होते. तरीही मडगाव पालिकेने 2020 मध्ये 37.50 लाख रुपये किंमतीचे तीन ट्रक खरेदी केले. त्यानंतर वाहतूक खात्याने त्यांची नोंदणी न केल्याने ते रस्त्यावर आणता आले नाहीत व गेल्या तीन वर्षांपासून हे ट्रक पालिकेच्या गॅरेजमध्ये धूळ खात पडून आहेत. लेखा परीक्षकांनी या ट्रक संदर्भातील सर्व माहिती 24 तासांत द्यावी, असे नगरपालिकेला सांगितले आहे. नगरपालिका त्यांना कशी व काय माहिती पुरविते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मडगाव पालिकेने वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना जानेवारीत ट्रकांच्या नोंदणीसाठी राजी करण्याचा घाट घातला होता. पण खात्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. खात्याने पालिकेला ही बाब सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज करुन त्यांच्याकडून नोंदणीसाठी परवानगी मिळवावी, असे अप्रत्यक्षरित्या सूचविले.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने अशा वाहनांच्या नोंदणीची परवानगी एका संस्थेला दिल्याचे पालिकेला कळविले होते. मात्र, पालिकेने अजून त्या संदर्भात काहीही हालचाल केलेली नाही, असे कळते.

नगरपालिकेच्या एका बैठकीत नगरसेवक घनश्याम प्रभू शिरोडकर यानी ट्रक संबंधीची बाब उपस्थित केली होती. पालिकेच्या वकिलांनीही सर्वोच्च न्यायालयाकडून नोंदणीसाठी परवानगी घेण्याचे नगरपालिकेला सुचविले होते.

ई-रिक्षाही धूळ खात पडूनच !

वर्षभरापासून गॅरेजमध्ये पडून असलेल्या दोन ई- रिक्षांचीही हीच स्थिती आहे. अंदाजे 8 लाख रुपये खर्चून मडगावमधील पदपथ स्वच्छ करण्यासाठी या रिक्षा खरेदी केल्या होत्या. त्यांच्या देखभाल करण्यासाठी कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, खरेदी केल्याच्या दोन ते तीन दिवसांनंतर या रिक्षा रस्त्यावरून गायब झाल्या व कंत्राटदारानेसुद्धा देखभाल सोडून दिली. नगरपालिकेला मात्र आर्थिक नुकसानी सोसावी लागली. या ई - रिक्षा कुठलीही निविदा न काढता घेतल्या होत्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT