Mungul Gang Rivalry Dainik Gomantak
गोवा

Mungul Firing Case: कोलव्‍यातील मार्गारिटा हॉटेलचाही हल्ल्याशी संबंध? व्हेन्झी व्‍हिएगस यांचा आरोप, मुंगूल गँगवॉरबाबत कारवाई करण्याची मागणी

Mungul Gang Rivalry: मुंगूल येथे गँगवॉरमधून झालेल्‍या हल्‍ल्‍यामागे कोलव्‍यातील मार्गारिटा या हॉटेलचाही संबंध आहे का याची चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी आमदार व्हेन्झी व्‍हिएगस यांनी केली आहे.

Sameer Amunekar

मडगाव: मुंगूल येथे गँगवॉरमधून झालेल्‍या हल्‍ल्‍यामागे कोलव्‍यातील मार्गारिटा या हॉटेलचाही संबंध आहे का याची चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्‍हिएगस यांनी केली आहे.

व्हेन्झी व्‍हिएगस यांनी, या प्रकरणी बुधवारी दक्षिण गोव्‍याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांची भेट घेऊन दक्षिण गोव्‍यातील गुन्‍हेगारी विश्‍वातील गँग्‍सच्‍या कारवायांवर नियंत्रण आणण्‍यासाठी पोलिस बंदोबस्‍त वाढवा आणि रात्रीच्‍या गस्‍ती सुरू करा, अशी मागणी केली.

मागच्‍या तीन वर्षात कोलवा आणि मुंगूल परिसरात अशातऱ्हेचे तीन जीवघेणे हल्‍ले झाले आहेत आणि या तिन्‍ही हल्‍ल्‍यांशी कोलव्‍यातील एका हॉटेलचा संबंध आहे. हे हॉटेल पहाटेपर्यंत चालू असते आणि हे हॉटेल गुंडांचा अड्डा बनलेला आहे.

या हॉटेलवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्‍यांनी केली. यावेळी त्‍यांच्‍याबरोबर आपचे जर्सन गोम्‍स व रॉक मास्‍कारेन्‍हस हे उपस्‍थित होते. मुंगूल येथे ज्‍यांच्‍यावर हल्‍ला झाला ते पहाटे उशिरापर्यंत या हॉटेलमध्‍ये होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

SCROLL FOR NEXT