Margao Accident News  Dainik Gomantak
गोवा

Margao News : ब्रेक फेल झाल्याने मडगाव पालिकेच्या वाहनाची दुचाकींना धडक

सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Accident News : मडगाव पालिकेच्या वाहनाला ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. पालिकेच्या वाहनाने पार्क केलेल्या 3 दुचाकींना धडक दिली. ही घटना सोमवारी दुपारी मडगावात घडली. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, मडगाव पालिकेच्या वाहनाने पार्क केलेल्या 3 दुचाकींना धडक दिली. या धडकेत दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत चालकाला सांगितले की, मुख्य रस्त्यावर घसरलेल्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी वाहन बाजूला घ्यावे लागले.

दरम्यान, या प्रयत्नात वाहनाचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकांना तसेच वाहनांना धडक बसण्यापासून वाचवण्यासाठी उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. धडकेत 3 दुचाकींचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बर्च नाईटक्लब अग्नितांडवावरून विधानसभेत गदारोळ; राज्यपालांच्या अभिभाषणावेळी हौदात गेलेल्या विरोधी पक्षातील आमदारांना काढले बाहेर

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

Viral Video: बड्या नेत्याचा साधेपणा की राजकीय स्टंट? खासदारसाहेब बनले 'डिलिव्हरी बॉय', ब्लिंकिटचा युनिफॉर्म घालून घरोघरी पोहोचवलं पार्सल

शेतीची जमीन अन् क्लबचा धंदा; हणजूण येथील 'त्या' क्लबला प्रशासनाचा दणका, ठोठावला 15 लाखांचा दंड

Goa Winter Session: विधानसभेत एक मिनिटाचे मौन! शिरगाव आणि हडफडे दुर्गटनेतील मृतांना वाहिली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT