मडगाव: पालिकेत सतरा लाखांची अफरातफर करुन फरार झालेल्या कनिष्ठ कारकून योगेश शेटकरला सहा महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. मडगाव फेस्त फेरीच्या सोपो करातून आलेली १७ लाखांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत न भरता परस्पर स्वत:च्या खात्यात वळवून लाखोंचा गफला केल्याचा आरोप त्याच्याविरोधात ठेवण्यात आला आहे.
सतरा लाखांची लाखांची अफरातफर करुन गेल्या सहा महिन्यांपासून संशयित योगेश शेटकर फरार होता. मडगाव पोलिसांनी गुरुवारी (०५ डिसेंबर) सकाळी त्याला अटक केली. शेटकर जून २०२४ पासून फरार होता, मडगाव पोलिसांनी जुलै महिन्यात त्याच्याविरोधात ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली होती.
घोटाळा समोर आल्यानंतर योगेशला निलंबित करण्यात आले होते. तसेच, पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मडगाव पोलिसांनी दोनवेळा योगेशला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले मात्र त्यांने दांडी मारली. पोलिसांनी त्याच्या घरी देखील तापस केला होता मात्र, तो फरार असल्याचे उघडकीस आले होते. पालिकेतून आलेल्या बोलवण्याला देखील योगेशने थारा दिला नव्हता.
एवढा मोठा घोटळा करुन फरार झालेल्या योगेशच्या शोधात मडगाव पोलिस गेल्या सहा महिन्यांपासून होते. दरम्यान, गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे. मडगाव पोलिस अधिक तपास करतायेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.