Margao Master Plan Dainik Gomantak
गोवा

Margao: पाहणीविनाच मडगावचा मास्टर प्लॅन! नागरिक संतप्त; प्रभागवार फिरण्‍याचे एजन्‍सीकडून आश्‍वासन

Margao Master Plan: प्रत्‍येक प्रभागात जाऊन सर्वेक्षण केले जाईल आणि नागरिकांच्‍या हरकती सूचना लक्षात घेतल्‍यानंतरच या आराखड्याला अंतिम स्‍वरूप दिले जाईल, असे आश्‍वासन या अधिकाऱ्यांना लोकांना द्यावे लागले.

Sameer Panditrao

मडगाव: मडगावच्‍या नियोजित मास्टर प्‍लॅन आराखड्यावर चर्चा करण्‍यासाठी बोलावलेली बैठक गदारोळातच संपली. हा मास्‍टर प्‍लॅन तयार करण्‍यासाठी ज्‍या एजन्‍सीला काम दिले हाेते, त्‍या एजन्‍सीने शहरात कुठेही प्रत्‍यक्षात न फिरता केवळ शहराचा बाह्यविकास आराखडा समोर ठेवून हा आराखडा तयार केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

नागरिकांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांची समर्पक अशी उत्तरे संबंधित अधिकारी देऊ शकले नाहीत. यावेळी या अधिकाऱ्यांच्‍या मदतीला धावून आलेले मडगावचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनाही नागरिकांच्‍या रोषाला सामोरे जावे लागले.

शेवटी प्रत्‍येक प्रभागात जाऊन प्रत्‍यक्ष सर्वेक्षण केले जाईल आणि नागरिकांच्‍या हरकती आणि सूचना लक्षात घेतल्‍यानंतरच या आराखड्याला अंतिम स्‍वरूप दिले जाईल, असे आश्‍वासन या अधिकाऱ्यांना लोकांना द्यावे लागले.

हा मास्‍टर प्‍लॅन तयार करण्‍याचे काम ‘स्‍टुडिओ पॉड’ या एजन्‍सीला देण्‍यात आले असून या एजन्‍सीने तयार केलेला आराखडा वस्‍तुस्‍थितीवर आधारित नाही, अशी हरकत यावेळी घेण्‍यात आली. मडगावच्‍या बाह्य विकास आराखड्याला काहीजणांनी हरकत घेऊन याविरोधात न्‍यायालयात धाव घेतलेली आहे. त्‍यामुळे हा बाह्यविकास आराखडाच विवादित बनलेला आहे.

असे असताना या आराखड्यावर आधारून मास्‍टर प्‍लॅन आराखडा कसा तयार केला, असा प्रश्‍न नागरिकांनी विचारला असता, संबंधित अधिकारी निरुत्तर झाले. गुरुवारी या मास्टर प्लॅनचे पालिका सभागृहात पॉवर पॉइंट सादरीकरण झाले असता, उपस्थित नागरिकांनी या त्रुटी उघडकीस आणून, नागरिकांची मते जाणून न घेता निर्णय कसा घेतला जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला.

आदेशानुसार कार्यवाही करू!

मागाहून पत्रकारांशी बोलताना ‘स्टुडिओ पॉड’ एजन्सीच्या प्रतिनिधीने सांगितले की, आम्ही लोकांचे म्हणणे एकूण घेतले आहे. प्रभागवार सर्वेक्षण करून लोकांची मते जाणून घेण्याची जी मागणी आहे ती आम्ही ‘जीसूडा’कडे सादर करणार असून, त्यांच्या पुढील आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.

नागरिकांकडून विविध प्रश्‍न उपस्थित

मडगाव बाह्यविकास आराखड्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. हा आराखडा आता न्यायप्रविष्ट आहे, मग या आराखड्याचा वापर कसा होऊ शकतो, असा सवाल आशिष कामत यांनी केला.

साळ नदी ही आता गटार बनली आहे. मात्र, या सादरीकरणात त्याचा उल्लेख नाही. वरून तेथे सौंदर्यीकरण करण्यात येत असल्याचे दाखविले आहे, असा आरोपही उपस्थितांनी केला.

सावियो कुतिन्हो यांनी रिंग रोडचा प्रश्न उपस्थित केला. बिल्डर लॉबीसाठी हा सारा अट्टहास असल्याचे प्रभव नायक म्हणाले. प्रदीप नाईक, संजीव रायतूरकर व अन्य लोकांनीही आक्षेप नोंदविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT