New GST Rates: गोव्‍यातील कॅसिनो उद्योगासाठी धक्‍का! जीएसटी 40 टक्‍के; पर्यटन, इतर व्यवसायांना फटका बसण्याची शक्यता

Goa casino GST: जीएसटी परिषदेची दोन दिवसांची महत्त्वाची बैठक सुरू झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
Goa casino penalty increase
Goa casino penalty increaseDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) रचनेतील प्रस्तावित बदलांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये आता केवळ पाच आणि १८ टक्के जीएसटी ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

यासोबतच पादत्राणे, तयार वस्त्रप्रावरणांवरील जीएसटी कमी करण्याचा तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग (एमएसएमई) आणि स्टार्टअपसाठीचा नोंदणी कालावधी तीसवरून फक्त तीन दिवसांपर्यंत आणण्याचेही ठरविण्यात आले आहे.

जीएसटी परिषदेची दोन दिवसांची महत्त्वाची बैठक आजपासून सुरू झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. बैठकीमध्ये ‘जीएसटी’चे सुलभीकरण हा प्रमुख मुद्दा होता. त्याबाबत तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित आज निर्णय झाल्याचे समजते. सध्याच्या कररचनेमध्ये ५, १२, १८ आणि २८ टक्के असे ‘जीएसटी’चे चार टप्पे करण्यात आले आहेत.

काय महाग, काय स्वस्त?

सुका मेवा, बदाम, काजू, पिस्ता, खजूर, मिक्स मेवा या वस्तूंवर याआधी १२ टक्के जीएसटी लागायची. पण आता या वस्तूंवर केवळ ५ टक्के जीएसटी लागणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध वस्तू, शेतीशी संबंधित वस्तू ज्यांच्यावर आधी १२ टक्के जीएसटी लागायचा तो आता ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच मार्बल, लेदर इत्यादी वस्तूंवरील देखील जीएसटी कमी करण्यात आला आहे.

सिमेंटवर याआधी २८ टक्के जीएसटी आकारला जायचा. पण आता १८ टक्के जीएसटी लावला जाईल.

Goa casino penalty increase
New GST Rate: जीएसटी कॉन्सिलचा मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के दोनच कर; काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर

आरोग्याशी संबंधित उपकरणे आणि ३३ औषधांवर आता जीएसटी लागणार नाही.

हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्सवर लागणाऱ्या जीएसटीतही घट झाली आहे. बूट आणि कपड्यांवरच्या देखील जीएसटीत घट करण्यात आली आहे. या वस्तूंवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून आता केवळ ५ टक्क्यांवर करण्यात आली आहे.

लक्झरी वस्तू जसे की कार, बाईक आणखी महाग होतील. यावर एक विशेष स्लॅब लावला जाईल. याशिवाय तंबाखू, पान मसाला, फ्लेवर, फ्रूट ड्रिंक आणि इतर पॅकेज्ड पेये महाग होतील. ३५० सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक महाग होतील.

Goa casino penalty increase
GST Slab: व्यापारी आणि ग्राहकांना मोठा दिलासा! GST प्रणाली होणार अधिक सोपी, दोन स्लॅब ठेवण्याच्या प्रस्तावाला मंत्रिगटाची सहमती

कॅसिनोंचा जीएसटी २८ वरून ४० टक्‍क्‍यांवर!

कॅसिनोंवर आकारण्‍यात येणारा २८ टक्‍के जीएसटी कमी करावा, अशी गोवा सरकारने केंद्राकडे मागणी केली होती. परंतु, त्‍याची पूर्तता झालेली नाही. नव्‍या घोषणेनुसार जुगार, घोड्यांची शर्यत, कॅसिनोंवरील जीएसटी २८ टक्‍क्‍यांवरून वाढवून तो ४० टक्‍के करण्‍यात आला आहे. गोव्‍यातील कॅसिनो उद्योगासाठी हा धक्‍का मानला जात आहे.

जीएसटी वाढवल्‍यास व्‍यवसाय व रोजगार संधींवर विपरित परिणाम होईल, अशी भीती कॅसिनो डेल्‍टाचे अध्‍यक्ष जयदेव मोदी यांनी यापूर्वी व्‍यक्‍त केली आहे. गोवा हे देशातील प्रमुख कॅसिनो केंद्र असल्याने जीएसटी वाढवल्‍यास पर्यटन उद्योगाचे नुकसान होऊ शकते, असा युक्‍तिवाद राज्‍य सरकारनेही केला होता.

बैठकीत जीएसटी दरांच्या संबंधित निर्णयाचे इतर सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे. देशाची आर्थिक रचना मजबूत आणि सर्वसमावेशक व्हावी, यासाठी ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेला बळकटी देणे गरजेचे आहे.

प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com