Margao Kidnapping Case Dainik Gomantak
गोवा

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: संजील कुडचडकर अपहरण प्रकरण! पत्नीचा कारने चिरडण्याचा धक्कादायक प्रयत्न; अपहरणानंतर कागदपत्रांवर सही घ्यायचा डाव

Margao Lab Owner Kidnapping: एआयसीसीचे सचिव के. सी. वेणुगोपाल गोव्यात आले असतानाही त्यांच्याकडे त्यांनी आपली बाजू मांडली होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: मडगावातील लॅबचालक संजील कुडचडकर यांचे बळजबरीने अपहरण करून त्‍यांना कारवार येथे नेल्‍यानंतर तेथे त्‍यांची पूर्वाश्रमीची पत्‍नी लुईझा फर्नांडिस हिने त्‍यांच्‍याकडून काही कागदपत्रांवर सही घेण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यावेळी संजील यांनी नकार दिल्‍यावर संतापलेल्‍या लुईझाने त्‍यांच्‍या अंगावर गाडी चढविण्‍याचा प्रयत्‍न केल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.

न्यायालयात दाखल केलेल्‍या लुईझाच्‍या जामीन अर्जाला विरोध करताना मडगाव पोलिसांनी जे निवेदन दिले, त्‍यातून ही थरारक घटना समोर आली आहे. २४ जुलै रोजी सकाळी ही अपहरणाची घटना घडली होती. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी लुईझा फर्नांडिस हिच्‍यासह या अपहरणात सामील असलेले नासीर बीन मसूद आणि शहा अली साैदागर अशा तिघांना अटक केली आहे. यातील लुईझा हिने जामिनासाठी अर्ज केला असून आज या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली.

या अर्जावरील निवाडा न्‍या. शिरगावकर यांनी उद्यापर्यंत राखून ठेवला आहे.यावेळी लुईझाच्‍या वतीने बाजू मांडताना ॲड. प्रशांत बोरकर म्हणाले, लुईझाने कुठल्‍याही कागदपत्रावर सही करण्‍यासाठी संजील यांचे अपहरण केले नाही, तर त्‍यांना सुधार केंद्रात दाखल करण्‍यासाठी ती त्‍यांना कारवारला घेऊन गेली होती. यापूर्वी तिने दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना तशा आशयाचे पत्रही लिहिले होते, असेही त्यांनी सांगितले.

मात्र, हा मुद्दा खोडून काढताना सरकारी वकील सॅनफर्ड फर्नांडिस म्हणाले, पोलिस तपासात जी माहिती समोर आली आहे, त्‍यानुसार कारवार येथील ज्‍या आरोग्‍य केंद्रात संजील यांना नेण्‍याचा प्रयत्‍न केला, तिथे त्‍यांचे रिहॅबिलीटेशन करण्‍यासाठी नव्‍हे, तर ॲडमिट करण्‍यासाठी नेले होेते. त्‍यासाठी त्‍या इस्‍पितळाला अधिक पैसे देण्‍याची तयारीही संशयितांनी दाखवली होती, अशी जबानी त्‍या इस्‍पितळातील कर्मचाऱ्यांनी मडगाव पोलिसांना दिल्‍याचे सांगितले.

बसमधूनही बाहेर काढण्याचा प्रयत्न

संजील यांनी अपहरणकर्त्यांच्‍या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत गोव्‍याकडे येणाऱ्या एका कदंब बसमध्‍ये ते चढले असता, त्‍या बसमध्‍येही लुईझासोबत असलेल्‍या दोघांनी आत शिरून त्‍यांना जबरदस्तीने बाहेर काढण्‍याचा प्रयत्‍न केला होता, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

यापूर्वी लुईझावर फोंडा पोलिस स्‍थानकात एक फसवणुकीसंदर्भात तर मडगाव पोलिसांत एका मारहाण प्रकरणात गुन्‍हा नोंद झाला आहे, हेही ॲड. स्‍पॅन्‍सर व्‍हिएगस यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले.

संजीलला बियर प्यायला दिली; पण...

संजील यांचे अपहरण केल्‍यानंतर त्‍यांना कारवार येथे नेताना वाटेत लुईझाने एका वाईन शॉपवर बियरच्या बाटल्या विकत घेतल्‍या. त्‍यावेळी संजीलनाही तिने बियर पिण्यास आग्रह केला; पण संजील यांनी त्‍यास नकार दिला, असे संजील यांच्या वतीने हस्‍तक्षेप याचिका दाखल केलेले ॲड. स्‍पॅन्‍सर व्‍हिएगस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Pakistani Cosmetic Creams: तुम्हीही गोरेपणासाठी 'ही' क्रीम वापरताय का? 2 पाकिस्तानी सौंदर्य उत्पादनांवर मोठी कारवाई; भारतीय ग्राहकांची होतेय फसवणूक

"माझी पत्नीही ओरडायला लागली..."; वैभव सूर्यवंशीला संघातून बाहेर, दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला...

SCROLL FOR NEXT