Margao Jewelers Murder Case Dainiak Gomantak
गोवा

Goa Crime: मडगाव ज्वेलर्स हत्या प्रकरणात 'ओंकार'ला सहा वर्षांनंतर सशर्त जामीन; खटल्याच्या विलंबाचा आरोपीला फायदा

Margao Jewelers Murder Case: मडगाव येथील ‘कृष्णनी ज्वेलर्स’च्या मालकाची दिवसाढवळ्या हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणातील मुख्य आरोपी ओंकार पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मडगाव येथील ‘कृष्णनी ज्वेलर्स’च्या मालकाची दिवसाढवळ्या हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणातील मुख्य आरोपी ओंकार पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. सुमारे सहा वर्षांच्या कारावासानंतर न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी हा निर्णय दिला.

२ सप्टेंबर २०२० रोजी मडगाव येथील कृष्णनी ज्वेलर्समध्ये मालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी ओंकार पाटील याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९८, २०१, १२०-ब तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सप्टेंबर २०२० पासून तो न्यायालयीन कोठडीत होता.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने या खटल्यात एकूण ११३ साक्षीदार असून, आतापर्यंत केवळ सात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आल्याचे निरीक्षण नोंदविले. भविष्यात हा खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. गोळीबार करणाऱ्या इतर सहसंशयितांच्या तुलनेत ओंकारची भूमिका ‘कमी तीव्रतेची’ असल्याचे न्यायालयाने प्रथमदर्शनी मान्य केले.

सरकारी वकिलांनी जामिनाला जोरदार विरोध केला. पीडिताच्या शरीरावर २१ जखमा होत्या आणि हा अत्यंत क्रूर गुन्हा होता, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच, आरोपीने २०१७ मध्ये पोलिस कोठडीतून पळ काढला होता, ही बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, दीर्घकाळाचा कारावास आणि खटल्यातील विलंब लक्षात घेता न्यायालयाने जामीन मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT