Margao Fire News Dainik Gomantak
गोवा

Margao Fire: दुर्दैवी प्रकार! आगीत कुत्र्याचा होरपळून मृत्यू, सर्व मालमत्ता जळून खाक; सोनेनाणेही आगीच्या भक्ष्यस्थानी

Margao Fire News: एका घराला अचानक आग लागून घरातील सर्व मालमत्ता जळून खाक झाली. या आगीत घरात असलेल्या एका कुत्र्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: पंचभाट–कारगिल परिसरात एका घराला अचानक आग लागून घरातील सर्व मालमत्ता जळून खाक झाली. या आगीत घरात असलेल्या एका कुत्र्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत अंदाजे ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मडगाव अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे.

अग्निशामक दलाचे अधिकारी गील सोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. सत्यवान नाईक यांच्या मालकीचे हे घर असून, आग लागली त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते.

शेजाऱ्यांच्या निदर्शनास आग येताच त्यांनी नाईक यांना तत्काळ माहिती दिली. मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत दोन बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.

आगीत घरातील संपूर्ण सामान, सुवर्णालंकार तसेच रोकड जळून खाक झाली आहे. परिसरात अन्य घरे जवळच असतानाही सुदैवाने त्यांना आगीची झळ बसली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकारी सोझा यांनी दिली.

काजूची झाडे जळून खाक

तालुक्यात आज तीन ठिकाणी सुक्या गवताला आग लागल्याची घटना घडली. यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पेडणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दलाच्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आणल्यामुळे संभाव्य मोठी हानी टळली. शुक्रवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास तुये येथील नव्या इस्पितळाच्या इमारतीजवळ असलेल्या डोंगरावरील वाळलेल्या गवताला ही आग लागली.

नंतर ४.१५ वाजता भाईडवाडा-कोरगाव येथे वाळलेल्या गवताला आग लागली. दोन्ही ठिकाणी लागलेल्या पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली. या आगीत काही काजूची व जंगली झाडे जळाली. नंतर संध्याकाळी ५ वाजता महाखाजन-धारगळ येथे डोंगरावरील गवताला आग लागण्याची घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT