Private Bus Drivers Margao Dainik Gomantak
गोवा

Private Bus Drivers : खासगी बसचालकांची सतावणूक; टॅक्सीचालकांची अरेरावी

Private Bus Drivers : टेम्पो ट्रॅव्हलर्सचालकांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसचालक आणि टेम्‍पो ट्रॅव्‍हलर्सचालकांची किनारपट्टी भागातील टॅक्‍सीचालकांकडून सतावणूक केली जाते. या बसचालकांना टॅक्‍सीचालकांच्‍या मारहाणीलाही सामोरे जावे लागते.

या सतावणुकीपासून आमची मुक्‍तता करावी, अशी मागणी आज बसचालक व टेम्‍पो ट्रॅव्‍हलर्स चालकांच्‍या प्रतिनिधींनी मडगावचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांच्याकडे केली आणि ही सतावणूक बंद करावी, अशी मागणी केली.

प्रशासन तोडगा काढू न शकल्‍यास आम्‍ही उच्‍च न्‍यायालयात जाणार असल्याच्या इशारा या चालकांचे प्रतिनिधित्व करणारे पराग रायकर यांनी दिला. पत्रकारांशी बोलताना रायकर म्‍हणाले, या चालकांमध्‍ये खासगी टॅक्‍सी चालकही असून त्‍यांनाही या किनारपट्टी भागातील टॅक्‍सी चालकांच्‍या सतावणुकीला सामोरे जावे लागते. हे चालक पर्यटकांना घेऊन जर तारांकित हॉटेलात गेल्‍यास तिथे त्‍यांची अडवणूक केली जाते.

या संबंधी वारंवार तक्रारी करुनही अजूनही या टॅक्‍सी चालकांची दादागिरी बंद झालेली नाही. टॅक्‍सी चालकांच्‍या दादागिरीला कंटाळून आता पर्यटकांनीही गोव्‍याकडे पाठ फिरविण्‍यास सुरू केले आहे. टॅक्‍सी चालकांच्‍या या दादागिरीमुळे गोव्‍याचा पर्यटन व्‍यवसाय धोक्‍यास आल्‍याचा आरोप रायकर यांनी केला.

ही दादागिरी बंद न झाल्‍यास आम्‍हाला न्‍यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील. जिल्हाधिकाऱी, मुख्‍यमंत्री, पर्यटनमंत्र्‍यांनाही आम्‍ही निवेदन देण्याचा बसचालकाचा विचार आहे, असे बसचालक म्हणाले.

अन्याय नको!

बस आणि टेम्‍पो ट्रॅव्‍हलर्स चालविणारे गोव्‍याचेच असून त्‍यांनी यासाठी मोठी गुंतवणूक केलेली आहे. अशा चालकांवर आम्‍ही अन्‍याय होऊ देणार नाही. पण व्यवसायावर परिणाम होऊ नये, असे मत रायकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT