Margao Court Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: 72 लाखांचं सोन लाटणाऱ्या बंगालमधील तिघांना मडगाव कोर्टाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर

Margao Court: ७२ लाखांच्या सोन्याच्या चोरी प्रकरणासंबंधी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या पश्चिम बंगालमधील तीन संशयितांना मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने सशर्त जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: ७२ लाखांच्या सोन्याच्या चोरी प्रकरणासंबंधी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या पश्चिम बंगालमधील तीन संशयितांना मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने सशर्त जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. पैकी एकाही अटीचा आरोपीनी भंग केल्यास त्यांचा जामीन रद्द होईल असेही न्यायालयाने आदेशात म्हटलेले आहे. सुप्रोकाश मंडल, संजय मंडल व तपस जना या पश्चिम बंगालातील तिघांना सोन्याच्या चोरीप्रकरणी पश्चिम बंगालात पकडून गोव्यात आणले होते.

दरम्यान, या तिघांनी ७२ लाख रुपये किंमतीचे ९५९ ग्रॅम सोने लंपास केले होते, अशी पोलिस तक्रार करण्यात आली होती. हे तिघे कामगार कोंब मडगाव येथील प्रितेश लोटलीकर यांच्या कारखान्यात कामाला होते. या आरोपींकडून (Accused) पोलिसानी १४.८५ लाख किंमतीचे २०५ ग्रॅम सोने जप्त केल्याची माहिती यापूर्वी पोलिसानी दिली होती.

या तिन्ही आरोपींनी १० हजार रुपयांचे वैयक्तिक बॉण्ड व तितक्याच रकमेच्या हमीवर आणि तितक्याच रकमेच्या इंडेम्नीटी बॉण्डवर जामिनावर सोडण्यात यावे. त्याचप्रमाणे चौकशी अधिकाऱ्याचे समाधान होईल असे हमीदार सादर करावेत, या आरोपींनी येत्या १० दिवसपर्यंत सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २.३० ते सायं. ५.३० पर्यंत पोलिस स्थानकात चौकशी अधिकाऱ्यापुढे हजर राहावे. न्यायालयाकडून (Court) परवानगी घेतल्याशिवाय आरोपींनी भारताबाहेर जाता कामा नये, आरोपीने त्याचप्रमाणे हमीदारांनी स्थानिक पत्ता, संपर्क क्रमांक, पूर्ण आकाराचे फोटो, चौकशी अधिकाऱ्याला सादर करावेत.

सशर्त जमीन

आरोपीने आपल्या मूळ गावातील तीन अतिरिक्त व्यक्तींचे पत्ते सादर करावेत, आरोपींनी या प्रकरणातील कोणत्याही पुराव्याकडे हस्तक्षेप करता कामा नये, अशा अटी न्यायालयाने लादलेल्या आहेत. वरील एकाही अटीची पूर्तता आरोपींनी न केल्यास त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा,असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gandhi Jayanti: एका दिवसाची गांधी जयंती अन् 364 दिवस अंधार; झाडू हातात घेण्यापेक्षा गांधीविचार जगण्याची गरज

Colvale Jail Threat: कैद्याकडून व्हिडिओ कॉलवर सुरा दाखवून धमकी? कोलवाळ कारागृहात खळबळ; हाय-सिक्युरिटी ब्लॉकची झडती

Shukra Gochar 2026: शरद पौर्णिमेचा चमत्कार! धनदाता शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, 5 राशींचे पालटणार नशीब; होणार पैशांचा वर्षाव

Teachers Digital Toolkit: गोव्यात शिक्षकांना मिळणार डिजिटल टूलकिट; 5,100 टॅब्लेटसाठी 'इन्फोटेक'कडून निविदा

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

SCROLL FOR NEXT