Margao Puzzle Car Parking Dainik Gomantak
गोवा

Margao Puzzle Car Parking: मडगावात 'पझल कार पार्किंग'ला हिरवा कंदील, वाहतूक व्‍यवस्‍था सुुधारणार; 7.77 कोटी रुपयांचे काम 'एसएमएस' कंपनीला

Margao puzzle car parking system: मडगाव शहरातील वाढत्या पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक बहुमजली ‘पझल कार पार्किंग’ प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मडगाव शहरातील वाढत्या पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक बहुमजली ‘पझल कार पार्किंग’ प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. गोवा राज्य नागरी विकास संस्थेने (जी-सुडा) नागपूरस्थित ‘एसएमएस’ लिमिटेड या कंपनीची निविदा मंजूर करत प्रकल्पाचे स्वीकृतीपत्र रविवारी जारी केले.

या प्रकल्पांतर्गत मडगाव येथील पी.टी. शीट क्रमांक २३८ मधील चालता क्रमांक ५४ (भाग), ३७२ आणि ४८२ (भाग) या जागेवर सहा स्तरांचे अत्याधुनिक इलेक्ट्रो-मेकॅनिकल पझल कार पार्किंग सिस्टम उभारण्यात येणार आहे. ‘डिझाईन, इंजिनीअरिंग, खरेदी, बांधकाम, चाचणी, कार्यान्वयन आणि देखभाल’ (ईपीसी) या पद्धतीने हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

‘जी-सुडा’ने या प्रकल्पासाठी ८ कोटी रुपयांची अंदाजित किंमत निश्चित केली होती. मात्र एसएमएस लिमिटेडने ७ कोटी ७७ लाख रुपयांची निविदा सादर केली. ही निविदा अंदाजित खर्चापेक्षा २.८७ टक्के कमी असल्याने ती स्वीकारण्यात आली आहे. या रकमेवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) स्वतंत्रपणे लागू होणार आहे.

काम सुरू करण्यापूर्वी कंत्राटदाराला ३८.८५ लाख रुपयांची कामगिरी हमी जमा करावी लागणार आहे. ही रक्कम करार मूल्याच्या पाच टक्के इतकी असून, स्वीकृतीपत्र जारी झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबतही विशेष अटी घालण्यात आल्या आहेत. पाया आणि संरचनात्मक आराखड्यांची तपासणी व प्रमाणन भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) किंवा भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून करून घेणे आवश्यक राहणार

आहे. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे देखभाल आणि संचालनाची जबाबदारीही कंत्राटदारावरच राहणार आहे. दरवर्षी संरचनात्मक लेखापरीक्षण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT